Marmik
Hingoli live News

काजीपेठ-मुंबई रेल्वेच्या मागणीलाही महाप्रबंधांकडून रेड सिग्नल!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली : काजीपेठ येथुन मुंबई (दादर) करिता चालणार्‍या रेल्वेला अकोला- हिंगोली – पूर्णा मार्गे करण्याची मागणीही दक्षिण मध्य रेल्वे विभागाने फेटाळून लावली आहे. आ. तान्हाजी मुटकुळे यांनी ही मागणी महाप्रबंधकांकडे केली होती.

ऑगस्ट महिन्यात हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे मागणी केली होती. ०७१९७ क्रमांकाची ही विशेष रेल्वे दर शनिवारी तेलंगाणा मधील काजीपेठ, चंद्रपूर, वणी, अदिलाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा मार्गे मुंबईच्या दादर स्थानकापर्यंत चालविली जात आहे. ही विशेष रेल्वे काजीपेठ येथून वर्धा, अकोला, हिंगोली, वाशिम व पूर्णा मार्गाने पुढे मुंबईकरिता चालवावी अशी मागणी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी केली होती.

या मार्गाने ही गाडी चालविल्यास मोठा फेरा पडेल तसेच प्रवाशांना असुविधा होईल, असा खुलासा दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अरूणकुमार जैन यांनी केला आहे. याच पत्रात महाप्रबंधकांनी जालना – मुंबई चालणारी जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोली स्थानकापर्यंत चालविण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला असल्याचेही सांगितले आहे.

दर दिवशी जालना- मुंबई चालणारी जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोली पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव खुद्द महाप्रबंधकांनी रेल्वे बोर्डाकडे पाठविला असेल तर निदान त्याला तरी मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी या भागातील प्रवाशांकडुन होत आहे.

… तर सचखंड अकोला मार्गे का नको?

तेलंगणा राज्यातील काजीपेठ येथून आठवड्यात धावणारी रेल्वे हिंगोली मार्गाने चालविण्यास नकार घंटा वाजवितांना महाप्रबंधक खुलासा देत आहेत की या मार्गामुळे अंतर वाढेल; मग नांदेड येथुन पंजाब राज्यातील अमृतसरला जाणारी रेल्वे मनमाड मार्गे कशी चालु आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे. पूर्णा येथून थेट अकोला मार्गे खंडवा अशी चालविल्यास सचखंड एक्सप्रेसचेही अंतर कमी होऊ शकते, ही गाडी नांदेडहुन निघुन औरंगाबाद, मनमाड, भुसावळ असा लांब १३७ किमीचा फेरा घेऊन खंडवा स्थानकापर्यंत येत असते. आठवडी रेल्वेला जर मार्ग वळविण्यासाठी जादा अंतराचा अडसर असेल तर दररोज चालणार्‍या सचखंड एक्सप्रेसला जादा अंतराने का सोडले जात आहे? असा सवालही प्रवाशांकडुन केला जात आहे. 

Related posts

शिवरानी जयस्वाल यांचे निधन

Gajanan Jogdand

लिंबाळा मक्ता एमआयडीसीत सर्विस केबल चोरी करणारा अटकेत, 48 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

प्रवासी निवाऱ्यासाठी विद्यार्थिनींचे अमर उपोषण! उपोषणाला कुरुंदा ग्रामस्थांचा पाठिंबा

Santosh Awchar

Leave a Comment