मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / जगन वाढेकर :-
सेनगाव – वडलावर असलेले कर्ज कसे फिटेल या चिंतेने सेनगाव तालुक्यातील कारेगाव येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना 27 नोव्हेंबर रोजी घडली.
नवल जयराम नायकवाल (वय 28 राहणार कारेगाव तालुका सेनगाव) यांनी त्याच्या वडिलावर असलेले कर्ज कसे भेटेल या चिंतेत नेहमी राहून कर्ज फिटत नसल्याने 27 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या पूर्वी (वेळ नक्की माहित नाही) सेनगाव येथील साई मंदिराच्या पाठीमागे पश्चिमेस दोन किमी अंतरावर बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन हत्या केली.
याप्रकरणी नवल नाईकवाल याचे वडील जयराम सूर्यभान नाईकवाल (50 वर्षे व्यवसाय शेती रा.कारेगाव) यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांच्या आदेशाने पोलीस नाईक 605 चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.
आत्महत्या पूर्वी स्वतःच स्वतःला अर्पण केली श्रद्धांजली!
वडीलावरील कर्ज कसे भेटेल या चिंतेत सतत राहणारा नवल नायकवाला या युवकाने गळफास घेण्यापूर्वी सोशल मीडियावर स्वतःचा फोटो अपलोड करून स्वतःला श्रद्धांजली वाहिली. त्याच्या आत्महत्येने जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे.