मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील शहर वाहतूक शाखेने 1 ते 27 नोव्हेंबर या दरम्यान वाहतूक नियम मोडणाऱ्या 2420 वाहनांवर कार्यवाही करून एकूण 16 लाख 95 हजार 700 रुपये व अति वेगाने वाहन चालविणाऱ्या 718 वाहनांवर दहा लाख 72 हजार 500 रुपये, तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 3138 वाहनांवर 27 लाख 68 हजार दोनशे रुपये इतका दंड आकारला आहे.
तसेच ज्या वाहनांच्या सायलेन्सर मध्ये बदल करून कर्णकर कस आवाज करणारे धोकादायकरित्या वाहन चालविण्या संबंधाने तीन मोटार सायकलवर एकूण 78 हजार 500 रुपये इतका दंड आकारण्यात येऊन त्यांचे वाहन डिटेन करण्यात आले.
ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा हिंगोलीचे पोलीस निरीक्षक A.I. सय्यद व वाहतूक शाखेचे सर्व पोलिस अंमलदार यांनी केली.
हिंगोली जिल्ह्यातील वाहनधारकांनी त्यांच्या ताब्यातील वाहन 18 वर्षाखालील मुला – मुलींना देऊ नये, असे आढळून आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल वाहनात केलेले अनधिकृत बदल (कर्णकर्कश हॉर्न/ सायलेन्सर) पूर्ववत करावे, तसेच स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी मोटार सायकल चालविताना हेल्मेटचा वापर करावा, धोकादायकरित्या किंवा ओव्हर स्पीड वाहन चालवू नये, सीट बेल्टचा वापर करावा.
शहरात वाहन व पार्किंग झोनमध्ये लावण्यात येऊ नये, विरुद्ध दिशेने वाहन चालू नये ट्रिपल सीट वाहन चालवू नये, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये, वाहनांवर स्पष्ट दिसेल असा नंबर टाकण्यात यावा, दोन-तीन आकडी नंबर किंवा रंगीत फॅन्सी नंबर प्लेट इत्यादी मध्ये दुरुस्ती करून शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे नंबर प्लेट बसविण्यात याव्यात आदी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत सर्व खाजगी वाहनधारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच जे वाहनधारक मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.