Marmik
Hingoli live

पाच टवाळखोरांवर दामिनी पथकाची कार्यवाही

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस व जनता सुसंवाद वाढविण्यावर विशेष भर देऊन शाळा, महाविद्यालय तसेच शिकवणी व वस्तीगृह या ठिकाणांसह शहरातील बस स्थानक, रेल्वे स्थानक, मुख्य बाजारपेठ परिसर, धार्मिक स्थळे व इतर गर्दीच्या ठिकाणी मुली, महिला व बालकांबाबत होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी दामिनी पथकास विशेष सूचना दिलेल्या आहेत. यानुसार दामिनी पथकाने सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या व टवाळखोर अशा एकूण 5 इसमावर कार्यवाही केली आहे.

हिंगोलीचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी मुली महिला व बालकांना सुरक्षितता वाटावी म्हणून दामिनी पथकास विशेष सूचना देऊन कार्यरत केले आहे.

सदर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण शिंदे पोलिस अंमलदार माधव बेले महिला पोलिस अंमलदार आरती साळवे, अर्चना नखाते, शेख सलमा यांची नेमणूक करण्यात आली आहे. दामिनी पथकाने मागील आठवड्यात 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या दरम्यान हिंगोली शहरातील महत्त्वाच्या एकूण 29 ठिकाणी भेटी दिल्या.

नमूद परिसरात सार्वजनिक शांतता भंग करणारे व टवाळखोर असे एकूण पाच इस्मानवर 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे. दामिनी पथकाने अडचणीच्या वेळी तात्काळ मदतीसाठी हेल्पलाइनची सेवा सुरू केली असून त्याचा प्रसार केला जात आहे.

तसेच दामिनी पथकाकडून 28 ऑक्टोबर रोजी नरसी नामदेव येथील जिल्हा परिषद प्रशाला, सेनगाव येथील जिल्हा परिषद प्रशाला व 30 ऑक्टोबर रोजी प्रशाला कवठा, पानकनेरगाव, साखरा तसेच 2 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद प्रशाला खंडाळा सवना, कनेरगाव नाका अशा एकूण आठ जिल्हा परिषद शाळांमध्ये स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रम अंतर्गत भेटी देऊन विद्यार्थ्यांना संकट काळातील सोबती डायल 112 तसेच गुन्हे प्रतिबंध व बालविवाह प्रतिबंध महिला व मुलींची सुरक्षा तसेच दामिनी पथक ऑनलाईन फसवणूक कायद्यासंदर्भात माहिती दिली.

तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय येथील कामकाजाबाबतही अवगत करून कवायत वाहतुकीचे नियम याबाबत देखील माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

Related posts

पोलीस भरती आवेदन पत्र भरण्यास मुदतवाढ

Gajanan Jogdand

29 लाख 78 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस परत

Santosh Awchar

श्रावण सरी होणार शब्दबद्ध! हिंगोली येथे राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन

Santosh Awchar

Leave a Comment