Marmik
Hingoli live News

सहा सोशल मीडिया वापरकर्त्यांवर सायबर सेलची कार्यवाही, मीडिया पेज अकाउंट केले बंद!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील सामाजिक शांतता व जातीय सलोखा टिकून राहावा तसेच सोशल मीडियाचा वापर करून त्यात बाधा येऊ नये त्यावर प्रतिबंध व्हावा त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथील सायबर सेल विभागास विशेष सूचना व मार्गदर्शन करून कार्यरत केले आहे.

सदर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांभ घेवारे, पोलीस अंमलदार जी.डी. पवार, पी. एस. थोरात, जे. पी. झाडे, डी. एन. नागरे, आर.डी. मुदीराज, आय.एस. पठाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर सायबर सेल विभागाने 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या दरम्यान कार्यवाही केली आहे.

काही समाजकंटकाकडून सोशल मीडियावर विविध समाजात, जाती, धर्मात तेढ निर्माण होईल तसेच महापुरुषांची विटंबना होईल व सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचेल अशा प्रकारच्या आक्षेपार्य पोस्ट केल्या जातात, परंतु त्यावर हिंगोली साहेबांचे टीम लक्ष ठेवून आहे.

मागील काही दिवसात अशा प्रकारे आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्या चार फेसबुक, एक ट्विटर व एक इंस्टाग्राम वापरकर्त्यांना प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 149 अन्वय नोटीस देऊन सोशल मीडिया पेज व अकाउंट बंद करण्याची प्रक्रिया केली आहे.

अशा प्रकारे जाती धर्मात तेढ निर्माण करणारे तसेच अफवा पसरवून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये व भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंद करणार असल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.

नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर समाज प्रबोधन सायबर जागृत होता. तसेच शैक्षणिक कामासाठी करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी केले आहे.

श्री. संभाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सायबर फसवणुकी बाबत मार्गदर्शन

हिंगोली सायबर सेलच्या पथकाने श्री. संभाजी महाविद्यालय हिंगोली येथे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये सायबर सेक्युरिटी तसेच सायबर फसवणुकी बाबत मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी कोणतेही अनोळखी एप्लीकेशन मोबाईल मध्ये डाऊनलोड करू नये. असे केल्यास आपल्या मोबाईल मधील डाटा चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आवाहन केले. तसेच अनेक विषय जसे की सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट करू नका, कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मैत्री स्वीकारू नका, आपल्या बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका, अशा प्रकारे सायबर बाबत माहिती दिली.

Related posts

Hingoli रिसाला येथील कारागीर घडवत आहेत देखण्या गणेश मूर्ती

Santosh Awchar

एकात्मिक कीड व्यवस्थापन अनुदानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

Santosh Awchar

अतिवृष्टीतून वगळण्यात आलेल्या मंडळातील गावांना सरसकट आर्थिक मदत द्या, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन

Gajanan Jogdand

Leave a Comment