मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जलजीवन मिशनच्या माध्यमातून “स्वच्छ जल से सुरक्षा” अभियाना अंर्तगत राबविण्यात येणार्या उपक्रमांर्तगत 7 डिसेंबर रोजी जैविक व रासायनिक क्षेत्रीय तपासणी संच (FTK KIT)वापराबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन षटकोणी सभागृह,जि.प.हिंगोली येथे करण्यात आले होते.
या प्रसंगी कैलास शेळके जिल्हा आरोग्य अधिकारी, मधुकर खडके उप अभियंता (ग्रा.पा.पु), संदिप काळे तालुका आरोग्य अधिकारी, डाॅ.यूसुफ साथरोग अधिकारी, भुजल सर्वैक्षण यंत्रणेच्या प्रयोगशाळेचे तंत्रज्ञ विणकरे, अनुप गोरे,भारत बेले हे उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यशाळेची सुरूवात झाली. राजेंद्र सरकटे मनुष्य बळ विकास शाखा यांनी सुत्र संचालन केले व तालुकास्तरावरिल प्रशिक्षणाबाबत माहिती दिली.
महेश थोरकर जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ञ यांनी स्वच्छ जल से सुरक्षा अभियाना मध्ये राबविण्यात येणारे विविध उपक्रमाबाबत माहिती दिली.तसेच जलसुरक्षक व आरोग्य सहाय्यक यांचे मार्फत पाणी नमुने प्रा.आ.केंद्र येथे दिनांक 23/12/22 पर्यंत जमा करण्याचे नियोजन करण्यात आले.
octopus चे INC श्री.मनिष पाटील यांनी रासायनिक व जैविक क्षेत्रीय तपासणी संचच्या FTK KITवापराबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले.
सदर कार्यशाळेस उपस्थित जल सुरक्षक व आरोग्यसह्याक यांनी प्रत्यक्ष रासायनाक FTK KIT द्वारे तपासणी करून पाहिली.रासायनिक व जैवीक तपासणी व WQMIS पोर्टल वरिल नोंदीबाबत श्री.प्रफुल्ल विणकरे प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी माहिती दिली.
या जिल्हास्तरीय कार्यशाळेस हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्याचे विस्तार अधिकारी पंचायत /आरोग्य,आरोग्य साहाय्यक, साहाय्यीका स्वच्छ मिशन कक्षाचे सर्व जिल्हा तज्ञ, गटसमन्वयक, समुह समन्वयक व सर्व प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे उपस्थित होते.