Marmik
Hingoli live News

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉल्या चोरणारा आरोपी जेरबंद, 8 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी केले स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉल्या चोरणाऱ्या आरोपीस हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने जेहेरबंद करून त्याच्याकडून 8 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कामगिरीने स्थानिक गुन्हे शालेय जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अभिनंदन केले आहे.

हिंगोली जिल्हा हद्दीत मागील काही दिवसांपासून चोरीचे गुन्हे घडले होते. गुन्हेगारांना तात्काळ अटक करून गुन्ह्यावर अंकुश घालण्याचे आदेश हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथकाने पेट्रोलिंग करून आरोपींची माहिती घेत असताना गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे बंडू नारायण कन्हेरकर (रा. इंचा ता. जि. हिंगोली) निष्पन्न करून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता त्याने हिंगोली तहसील कार्यालय येथील प्रांगणातून, विडोळी शिवारातून पळशी येथील आखाड्यावरून, तसेच सम्राट नगर हिंगोली येथून ट्रॅक्टर ट्रॉल्या चोरी केल्याची कबुली दिली.

सदर माहिती संदर्भाने खात्री केली असता हिंगोली शहर पोलीस ठाण्यात एक हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन व गोरेगाव पोलीस ठाण्यात एक असे एकूण चार गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले.

सदर आरोपीकडून गुन्ह्यात चोरी गेलेल्या चार ट्रॅक्टर ट्रॉल्या व गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन असे एकूण 8 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कार्यवाही जिल्ह्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने,पोलीस अंमलदार संभाजी लकुळे, शेख शकील, नितीन गोरे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, चालक तुषार ठाकरे शेख जावेद यांनी केली. एकूण चार गुन्हे उघड करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केल्याने डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे अभिनंदन केले.

Related posts

हिंगोली येथील साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, आमदार संतोष बांगर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Santosh Awchar

पाण्याअभावी खरीप हंगाम धोक्यात! शेतकरी चिंतेत, सेनगाव तालुक्यातील चित्र

Gajanan Jogdand

नियम मोडणाऱ्या वाहनांवर कार्यवाही सुरूच, सात दिवसात अकरा लाख 76 हजार 250 रुपयांचा दंड वसूल

Santosh Awchar

Leave a Comment