Marmik
Hingoli live News

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणची वाघजाळीत ऐशी की तैशी! हागणदारी मुक्त ग्रामपंचायतीलाही फासला हरताळ

सेनगाव – तालुक्यातील वाघजाळी येथून जाणाऱ्या आजेगाव म्हाळशी रोडवरील घाणीचे चित्र. (छायाचित्रसेवा मार्मिक महाराष्ट्र)

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – सेनगाव तालुक्यातील वाघजाळी ग्रामपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सहभाग नोंदविला, मात्र हा सहभाग केवळ नावालाच असल्याचे चित्र येथे दिसून येते. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीची यावरून अशीच परिस्थिती असल्याचे दिसते. असो. वाघजाळी येथे या अभियानासह हागणदारी मुक्त गाव अभियानालाही हरताळ असल्याचे दिसून आले. गावातून जाणाऱ्या माळशी – आजेगाव रोडवर ग्रामस्थ उघड्यावर शौचास बसत असल्याचे चित्र येथे आढळून आले.

महाराष्ट्र शासन मागील कित्येक वर्षांपासून हागणदारीमुक्त गाव योजना राबवत आहे. मात्र या योजनेचे फलित अद्यापही काही झाल्याचे दिसत नाही.

काही ग्रामपंचायती वगळल्यास अनेक ग्रामपंचायती केवळ निधी उचलून खाण्यासाठीच या योजनेत सहभागी होत असल्याचे दिसते. त्यातीलच एक प्रकार वाघजाळी येथे घडल्याचं दिसते. वाघजाळी ग्रामपंचायतला हागणदारीमुक्त गाव योजनेचा विसरच पडल्याचे दिसते. गावात जागोजागी कचऱ्याचे ढिगार साचले असून ग्रामपंचायती समोरच सांडपाणी रोडवर सोडले जाते.

गावातील अनेक रोडवर सांडपाणी येत असून गावातून जाणाऱ्या माळशी – आजेगाव रोडवर ग्रामस्थ उघड्यावर शौचास बसत असल्याचे चित्र आहे. पंचायत समिती स्तरावर काही वर्षांपूर्वी गुड मॉर्निंग पथक तैनात केले होते, मात्र हे पथक आता कुठेही दिसत नाही. परिणामी वाघजाळी येथे उघड्यावर जाणाऱ्यांची संख्या कायम असल्याचे दिसते.

या रस्त्यावरून जाताना पुरावाशी वाहनधारकांना नाकास रुमाल बांधून ये – जा करावी लागते. तसेच गावात ठिकठिकाणी अस्वच्छता असून ग्रामस्थ उघड्यावर शौचास बसत असल्याने गावचेच आरोग्य धोक्यात आले आहे.

असे असले तरी या ग्रामपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 मध्ये सहभाग नोंदविला असल्याचे ग्रामसेवक गजानन काकडे यांनी मार्मिक महाराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 मध्ये सहभागी झालेल्या या वाघजाळी ग्रामपंचायतीला स्वच्छतेचा विसर पडल्याचे दिसते.

या प्रकरणाची गटविकास अधिकाऱ्यांसह जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन पाहणी करून शासनाची फसवणूक करणाऱ्या संबंधित ग्रामसेवक व दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.

Related posts

‘जिथे कमी तिथे आम्ही’ उपक्रमांतर्गत माझोड येथील भावंडांना शालेय पुस्तकांचे वाटप

Santosh Awchar

आडोळ ते रेपा रोडचे बांधकाम निकृष्ट! काम चांगले करण्याचे ग्रामपंचायतची मागणी

Gajanan Jogdand

खानापूर चित्ता, केसापूर, बळसोंड, दाटेगाव येथे पालक सचिव नितीन गद्रे यांची भेट

Santosh Awchar

Leave a Comment