Marmik
Hingoli live News

दरोडा, जबरी चोरी व घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; 6 लाख 1500 रुपयांचा मुद्देमाल जप्त! 13 गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यात रात्रीच्या वेळी घरफोडी, दरोडा, जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. याबाबत हिंगोली शहर पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस ठाणे कळमनुरी व बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. सदरचे गुन्हे करणाऱ्या टोळीला पकडून नमूद गुन्हे उघड करणे व घरफोडी, दरोडा, जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले होते.

हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेस नमूद घरफोडी, दरोडा, जबरी चोरी चे गुन्हे उघड करण्याबाबत व सदर गुन्हेगारांच्या टोळीला पकडण्याबाबत आदेश देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले होते.

त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यांचा घटनास्थळ व परिसर व असे गुन्हे करणाऱ्या आरोपींबाबत गोपनीयरित्या माहिती घेऊन तंत्रशुद्ध तपास पद्धती आणि सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने नमूद गुन्हे करणाऱ्या टोळी बाबत माहिती काढली.

सदर गुन्हे नांदेड कळमनुरी व हिंगोली येथील आरोपींनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले. या तपास पथकाने गुन्ह्यातील आरोपी बाळू पंडित नामनूर (वय 23 वर्षे राहणार कुंडलवाडी तालुका कळमनुरी हल्ली मुक्काम पेडगाव ता. जि. हिंगोली) व त्याचा साथीदार संजय उर्फ समीर पंडित नामनूर (वय 30 वर्ष रा. कुंडलवाडी तालुका कळमनुरी हल्ली मुक्काम मदिना नगर कळमनुरी), शंकर उर्फ डिंक्या रमेश खांडेकर (वय 25 वर्षे रा. बामणी तालुका हदगाव हल्ली मुक्काम अंबा नगर सांगवी नांदेड), सय्यद हनीफ उर्फ हनी सय्यद जाफर (वय 22 वर्षे रा. महेबुब नगर नांदेड), सय्यद जाकेर उर्फ मुजफर सय्यद जाफर (वय 26 वर्ष रा. महबूबनगर हल्ली मुक्काम हिमायतनगर (सासरवाडी) नांदेड, संतोष शंकर खांडेकर चा मित्र राहणार नांदेड व इतर चार आरोपी यांच्यासोबत मिळून घरफोडी, जबरी चोरी व दरोडा टाकून त्यातून मिळालेले पैसे आपसात वाटून घेत होते असे सांगितले.

आरोपीकडे विचारपूस केले असता हिंगोली जिल्ह्यात दरोडा जबरी चोरी व घरफोडी असे तेरा गुन्हे केल्याची कबुली दिली.

यातील अटक आरोपीकडून तपासा दरम्यान सोन्या-चांदीचे दागिने (किंमत अंदाजे 4 लाख 21 हजार रुपये) तसेच मोबाईल व मोटारसायकल (किंमत अंदाजे 1 लाख 60 हजार रुपये) तसेच अगदी 20 हजार 500 रुपये असा एकूण 6 लाख एक हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर उघड गुन्ह्यांमध्ये फेब्रुवारी 2022 मध्ये उमरा फाटा येथील श्री गजानन मार्केट वरील दरोडा, शिवनी येथील श्री दत्तकृपा मार्केटचे मालक यांची मोटार सायकल अडून लूटीचा प्रयत्न करणे, जोडतळा येथील घरात घुसून जबरी चोरी करणे आदी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.

सदर आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून त्यांनी मागील दहा वर्षांपासून यवतमाळ नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली येथे गुन्हे करत असून त्यांच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोरी व घरफोडीच्या जवळपास 60 गुन्हे दाखल आहेत.

ही कार्यवाही हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, पोलीस अंमलदार संभाजी लकुळे, गजानन पोकळे, लिंबाजी वाहुळे, ज्ञानेश्वर पायघन, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, इमरान पठाण, प्रमोद थोरात, जयप्रकाश झाडे, दत्ता नागरे, गजानन पवार, रोहित मुदीराज, चालक तुषार ठाकरे व शेख जावेद यांनी केली.

एकूण 13 गुन्हे उघड करून चोरी गेलेला माल जप्त केल्याने हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे अभिनंदन केले.

Related posts

सेनगाव येथील 952 गटातील अनेकांच्या नावे 7/12 नाही! क्षेत्रफळ दुरुस्त करण्याची मागणी

Gajanan Jogdand

युनिसेफ मार्फत आरोग्य विभागातील विविध योजनांच्या जनजागृतीसाठी साहित्याचे वाटप

Gajanan Jogdand

स्थानिक गुन्हे शाखेची अवैध दारू विक्रीवर कारवाई; साडे पंधरा हजार रुपयांचा दारू साठा जप्त

Santosh Awchar

Leave a Comment