Marmik
Hingoli live

तीन गुन्हेगार दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार, सतत गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या टोळी विरुद्ध पोलीस अधीक्षकांची कठोर कार्यवाही

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्याचा पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालविणाऱ्या विरुद्ध तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाहीची भूमिका असे गुन्हे सतत करणारा विरुद्ध प्रभावी प्रतिबंध कार्यवाही केली जात आहेत.

हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील माळवटा गावातील राहणारे सराईत गुन्हेगार विश्वनाथ बबनराव लडके (वय 32 वर्ष), ज्ञानेश्वर रामचंद्र लडके (वय 21 वर्ष) व विजय श्रीरंग कसारे (वय 24 वर्ष व्यवसाय मजुरी तिन्ही रा. माळवटा ता. वसमत जि. हिंगोली) यांच्या विरुद्ध वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात माला विरुद्ध एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.

सतत संघटितपणे हे आरोपी गुन्हे करतच आहेत व त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांच्या अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालीमुळे परिसरातील नागरिकांच्या मालमत्तेस धोका उत्पन्न होत असल्याने पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी सदर प्रकरणी कठोर प्रतिबंध कार्यवाही बाबत आदेश दिले.

यावरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एस. जी. यामावर यांनी नमूद आरोपीं विरुद्ध कलम 55 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये हद्दपारचा प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग हिंगोली शहर विवेकानंद वाखारे यांनी सविस्तर चौकशी करून नमूद आरोपींच्या टोळीस हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे शिफारस केली.

यावरून नमूद प्रकरणी सविस्तर तपासणी करून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 नमूद आरोपींना आजपासून पुढील दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्याबाबत आदेश काढले आहेत.

हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर हे समाजात शांतता नांदावी म्हणून सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्याबाबत कोंबिंग व ऑल आऊट ऑपरेशन मधून त्यांची नियमित तपासणी तसेच त्यांच्या बाबत कठोर प्रतिबंधक कार्यवाही करत आहेत.

Related posts

91 हजार हेक्टर क्षेत्र पेरणी विना; पावसाच्या विलंबाचा खरीपास फटका

Jagan

निजाम काळापासून चालत आलेला गुगुळपिंपरी येथील दसरा महोत्सव; उत्सवाने जोपासल्या अनेक कला! नवसाला पावणाऱ्या देवांची गावातून काढली जाते आगळीवेगळी मिरवणूक

Gajanan Jogdand

अजित मगर उचलणार शिव धनुष्य

Gajanan Jogdand

Leave a Comment