Marmik
News

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाला अखेर आली जाग; 21 पान टपऱ्यांवर धडक कार्यवाही 

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – शहरात तसेच जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या आवारात मोठ्या प्रमाणात पानटपऱ्या चालविल्या जात होत्या यामुळे शालेय मुले व्यसना च्या आहारी जाऊन त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला होता. याबाबत मार्मिक महाराष्ट्र ने वेळोवेळी आवाज उठविला होता. अखेर जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकास जाग येऊन त्यांनी 21 पान टप्प्यांवर धडक कार्यवाही केली. या कारवाईने नागरिक व पालकांतून समाधान व्यक्त होत आहे.

हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निर्देशानुसार सर्व शासकीय कार्यालये व शाळांचा परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणे तंबाखू मुक्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज दि. 22 डिसेंबर, 2022 रोजी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या सुचने नुसार जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाद्वारे औंढा (ना) येथे बसस्टँड परिसरातील पान टपऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या. 

तंबाखू विरोधी कायदा (कोटपा-2003) नुसार सर्व सार्वजनिक परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ खाणे, थुंकणे, व विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. औंढा (ना) येथे बसस्टँड व  मंदिर परिसरात ह्या कायद्याचे उल्लंघन होताना सर्रास दिसते.

औंढा  पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्हि. के. झुंजारे यांच्या सहकार्याने बीट जमादार इम्रान पठाण, संदीप टाक, मराठवाडा ग्रामीण संस्था, औरंगाबादचे अभिजित संघई, व जिल्हा रुग्णालया तर्फे आनंद साळवे, कुलदीप केळकर व इतर कर्मचारी ह्यांच्या पथकाने  परिसरातील ठिक-ठिकाणी उलघाल करणाऱ्या पान टपऱ्यांवर दांडात्मक कार्यवाही केली.

ह्या कार्यवाहीत एकूण 21 लोकांकडून रु. 10650/- एवढा दंड वसूल करण्यात आला.कोटपा 2003 च्या नुसार कलम 4 – सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी आहे. कलम 5 – तंबाखूयुक्त पदार्थ जाहिरात बंदी. कलम 6 – ‘अ’  18 वर्षा खालील मुलांना तंबाखूयुक्त पदार्थ विकण्यास सक्त मनाई. कलम 6 ‘ब’  शैक्षणिक संस्थांच्या 100 मी. परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ विक्री, सेवन बंदी तर कलम 7 – अन्वये कोणत्याही तंबाखूयुक्त पदार्थावर (पाकिटावर) कर्करोगविषयी चेतावणी पाकिटाच्या 85 % भागावर असावी.

Related posts

शेगाव खोडके येथील दोघे एका वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार ! हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची कठोर कार्यवाही

Gajanan Jogdand

…अन्यथा ईशान्य भारत देशा पासून कायमचा तुटेल! – राज ठाकरे

Gajanan Jogdand

विशेष मोहिमेत हिंगोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; फरार एकूण 50 इसमांना पकडून न्यायालयात केले हजर!

Santosh Awchar

Leave a Comment