Marmik
Hingoli live

आणखी एक आरोपी कारागृहात स्थानबद्ध

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यातील हट्टा पोलीस ठाणे परिसरातील शरीराविरुद्ध गुन्हेगारावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही सदरील गुन्हेगार हा गुन्हेगारी वृत्तीपासून परावर्त होत नसल्याने हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी नमूद सराईत गुन्हेगाराविरुद्ध नमूद पोलीस ठाणे काढून एमपीडीए प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

यावरून हट्टा पोलीस ठाणे येथील सराईत गुन्हेगार नामे सुनील शिवाजीराव वाघमारे (वय 30 वर्ष रा. शास्त्रीनगर जवळा बाजार ता. औंढा नागनाथ जि. हिंगोली) याचा एमपीडीए प्रस्ताव क्रमांक 01 / 2022 प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीए बोराटे व पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे हट्टा पोलीस ठाणे यांनी सादर केला.

त्यातील स्थानबद्ध इसम नामे सुनील शिवाजीराव वाघमारे हा नेहमी हिंगोली जिल्ह्यातील हट्टा पोलीस ठाणे, सेनगाव व बाहेर जिल्ह्यातील परिसरात शरीराविरुद्ध अवैध शस्त्र बाळगून दहशत निर्माण करीत असल्याने त्याच्या विरुद्ध एमपीडीए कायद्याप्रमाणे कार्यवाही करून हिंगोली जिल्हाधिकारी यांच्याकडून एक वर्षासाठी स्थानबद्ध आदेश पारित करून घेऊन स्थानबद्ध इसमास परभणी कारागृहात दाखल करण्यात आले आहे.

ही कारवाही हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग वसमत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय व इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वेळोवेळी सदर प्रस्तावा बाबत पाठपुरावा करून सदर कार्यवाही मध्ये मदत केली.

सराईत गुन्हेगारास एमपीडीए कायद्यांतर्गत कारागृहात स्थानबद्ध करण्याची ही जिल्ह्यातील सहावी कार्यवाही आहे.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी यापुढे समाजात शांतता नांदावी म्हणून मालाविरुद्ध, शरीराविरुद्ध व अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत व प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही करत आहेत.

Related posts

पप्पू चव्हाण गोळीबार प्रकरण; मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात, पुणे जिल्ह्यातून केले अटक

Gajanan Jogdand

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: वाई येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण

Santosh Awchar

1 लाखाची लाच घेताना ग्रामसेवक चतुर्भुज! जलजीवनच्या कामासंदर्भात घेतली लाच

Gajanan Jogdand

Leave a Comment