Marmik
Hingoli live News

कळमनुरी येथे वन विभागाची मोठी कारवाई: एक लाख रुपयांचे सागवान जप्त!

हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती मीनाक्षी पवार यांनी कळमनुरी येथे जप्त केलेले सागवान.

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील नूतन वनपरिक्षेत्राधिकारी श्रीमती मीनाक्षी पवार यांनी पदभार घेताच आपल्या कर्तव्याचा परिचय देत एक लाख रुपयांचे सागवान जप्त केले आहे. सदरील सागवान हिंगोली येथे आणण्यात आले आहे.

हिंगोली येथील नूतन कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्राधिकारी श्रीमती मीनाक्षी पवार यांनी हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचा पदभार स्वीकारताच अवैध वृक्षतोड वाहतूक याकडे लक्ष देऊन या कार्यालयाचा पदभार घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातच मोठ्या प्रमाणात सागवान जप्त केले आहे.

21 डिसेंबर कळमनुरी येथे वनपरिक्षेत्राधिकारी मीनाक्षी पवार, वनरक्षक काशीदे, स्वप्निल क्षीरसागर, अशोक चव्हाण यांच्या पथकाने वेगवेगळ्या सहा ठिकाणी छापे मारत पाच घनमीटर साग जप्त केला. तसेच 23 डिसेंबर रोजी उमरदरा वाडी वारंगा परिक्षेत्रात अंदाजे 1.352 घन मीटर अवैध साग जप्त करण्यात आला.

ही कारवाई हिंगोली वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती मीनाक्षी पवार ,वनरक्षक चव्हाण ,वनरक्षक फड ,वनरक्षक केंद्रे यांनी केली. जप्त करण्यात आलेल्या या एकूण सागवानाची किंमत अंदाजे एक लाख रुपये असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती मीनाक्षी पवार यांनी सांगितले.

जप्त करण्यात आलेला साग हिंगोली येथे आणण्यात आला आहे. या प्रकरणाचा पंचनामा करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती मीनाक्षी पवार यांनी केलेल्या या कारवाईचे विभागीय वनाधिकारी बी.एच. कोळगे यांनी व सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन केले जात आहे.

Related posts

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने महिलेस २ लाख ३२ हजारांची वैद्यकीय मदत

Gajanan Jogdand

दिलासादायक : शेतकऱ्यांनो! आता एक रुपयात काढा पीक विमा!! लूट थांबविण्यासाठी राज्य शासनाने घेतला निर्णय

Gajanan Jogdand

22 मे ला होणार सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापतीची निवड; अनेक जण इच्छुक

Gajanan Jogdand

Leave a Comment