Marmik
क्राईम

कळमनुरी येथे सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या सात जणांविरुद्ध कार्यवाही

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यातील कळमनुरी येथे सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या सात जणांविरुद्ध हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने प्रतिबंधात्मक कार्यवाही केली आहे.

हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण शिंदे, महिला पोलीस अंमलदार आरती साळवे, अर्चना नखाते, शेख सलमा यांनी 17 डिसेंबर ते 24 डिसेंबर या दरम्यान हिंगोली शहरातील शाळा, महाविद्यालय, तसेच शिकवणी व वस्तीगृह या ठिकाणी त्याचप्रमाणे शहरातील बस स्थानक, रेल्वे स्थानक, मुख्य बाजारपेठ परिसर व धार्मिक स्थळे तसेच गर्दीच्या ठिकाणी सतत पेट्रोलिंग करत 32 वेळा भेटी दिल्या आहेत.

21 डिसेंबर रोजी दामिनी पथकाने जिल्हा परिषद माध्यमिक प्रशाला कळमनुरी, सातव महाविद्यालय, महात्मा फुले महाविद्यालय, गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच त्यांना मार्गदर्शन केले.

सदर ठिकाणी पेट्रोलिंग दरम्यान कळमनुरी शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरात आरडाओरडा करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या एकूण सात युवकांवर कळमनुरी पोलीस ठाणे येथे कलम 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय प्रतिबंधात्मक कार्यवाही केली.

Related posts

दरोडा घरफोड्या करणाऱ्या आरोपीच्या मुस्क्या आवळल्या! 4 लाख 20 हजार रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Santosh Awchar

27 लाख 96 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक फिर्यादीस केला परत

Santosh Awchar

हिंगोलीच्या गाडीपुरा भागातील सतत गुन्हे करणारा तरुण एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध

Santosh Awchar

Leave a Comment