Marmik
Hingoli live क्राईम

दोन सराईत गुन्हेगार एका वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली चा पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालविण्याविरुद्ध तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाहीची भूमिका घेत असे गुन्हे सतत करणाऱ्या विरुद्ध प्रभावी प्रतिबंध कार्यवाही केली जात आहे.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हट्टा पोलीस ठाणे हद्दीतील पोटा तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली गावातील राहणारे सराईत गुन्हेगार व्यंकटी विठ्ठल शेळके (वय 56 वर्ष) व गोविंदा व्‍यंकटी शेळके (वय 31 वर्ष) यांच्याविरुद्ध हट्टा पोलीस ठाणे येथे शरीराविरुद्ध दोन गुन्हे दाखल असून सतत संघटितपणे गुन्हे करतच आहेत.

त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांच्या अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालीमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका उत्पन्न होत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सदर प्रकरणी कठोर प्रतिबंध कार्यवाही बाबत आदेश दिले होते.

यावरून हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.ए. बोराटे यांनी नमूद आरोपींना विरुद्ध कलम 55 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय हद्दपारचा प्रस्ताव दाखल केला होता.

सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग हिंगोली शहर विवेकानंद वाखारे यांनी सविस्तर करून नमूद आरोपीच्या टोळीस हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे शिफारस केली होती.

नमूद प्रकरणी सविस्तर तपासणी करून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अन्वय नमूद दोन आरोपींना आज पासून पुढील एका वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्या बाबत आदेश काढले आहेत.

हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर हे समाजात शांतता नांदावी म्हणून सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्याबाबत कोंबिंग व अलाऊट ऑपरेशन मधून त्यांची नियमित तपासणी तसेच त्यांच्या बाबत कठोर प्रतिबंधक कार्यवाही करत आहेत.

Related posts

हिंगोलीच्या तापमानाने चाळिशी ओलांडली! नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

Gajanan Jogdand

सकल मातंग समाजाचे भर पावसात सेनगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन; प्रलंबित मागण्या मान्य करण्याची मागणी

Gajanan Jogdand

कागदपत्र काढण्यासाठी हिंगोली तलाठी घालताहेत आडकाठी

Gajanan Jogdand

Leave a Comment