Marmik
Hingoli live News

पोलीस भरती : खटकाळी बायपास ते अकोला बायपास महामार्गावर होणार 1600 मीटर धावण्याची मैदानी चाचणी, वाहतुकीसाठी महामार्ग राहणार बंद

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – शहरात पोलीस भरती 2021 च्या अनुषंगाने दोन जानेवारी ते 4 जानेवारी यादरम्यान मैदानी चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. 1600 मीटर धावण्यासाठी ट्रॅक उपलब्ध नसल्याने सदरील मैदानी चाचणी ही खटकाळी बायपास ते अकोला बायपास महामार्गावर घेतली जाणार आहे. त्यामुळे सदरील महामार्ग बंद करण्यात येणार आहे.

पोलीस भरती – 2021 च्या अनुषंगाने दिनांक 2 जानेवारी ते 4 जानेवारी 2023 पर्यंत मैदानी चाचणीचे आयोजन केले असून 1600 मीटर धावण्यासाठी मैदान उपलब्ध नसल्याने सदर रेषेतील ट्रॅक अकोला बायपास ते खटकाळी बायपास रोडवर उपलब्ध असल्याने सदर रोडवर 1600 मीटर धावण्यासाठी ट्रॅक बनविण्यात आलेला आहे.

सदर ठिकाणी वाहण्याच्या धडकेने जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी सदर कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारांन्वय दिनांक 2 जानेवारी ते 4 जानेवारी 2023 पावे तो पहाटे पाच ते 11.59 पर्यंत वरील कलमान्वये वाहतुकीच्या नियमात अधिसूचना काढली आहे.

पोलीस भरती – 2021 च्या अनुषंगाने 2 ते 4 जानेवारी 2023 पावे तो पहाटे 5 ते सकाळी 11.59 पर्यंत उमेदवार मैदानी चाचणी होणार असून वाहनाच्या वाहतूक व्यवस्थेत नमूद वेळेसाठी तात्पुरत्या स्वरूपात पुढील प्रमाणे पर्यायी मार्गावरील वाहतूक वळण देऊन बदल करण्यात आला आहे.

वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग

अकोला बायपास येथून खटकाळी बायपास साठी जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद. खटकाळी बायपास येथून अकोला बायपास साठी जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद.

हिंगोली शहरातील श्रीनगर येथून अकोला बायपास व खटकाळी बायपास कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद.

मौजे कारवाडी पिंपळखुटा येथून अकोला बायपास व खटकाळी बायपास कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद.

गंगानगर येथून अकोला बायपास व खटकाळी बायपास कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

हिंगोली शहरातून दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांसाठी गंगानगर खानापूर कळमनुरी साठी बिरसा मुंडा चौक खटकाळी मंदिर खटकाळी बायपास मार्गे गंगा नगर खानापूर कळमनुरी कडे जातील.

हिंगोली शहरातून तसेच औंढा नागनाथ सेनगाव वाशिम येथून कळमनुरी साठी जळ वाहतूक, बसेस यांना जाण्यासाठी नांदेड नाका इंदिरा चौक रीसाला बाजार अकोला बायपास बासुंबा कॉर्नर मार्गे खानापूर बायपास कळमनुरी साठी जातील.

कळमनुरी येथून हिंगोली शहरात येण्यासाठी दोन चाकी तीन चाकी चार चाकी वाहनांसाठी खानापूर खटकाळी बायपास खटकाळी मंदिर बिरसा मुंडा चौक येथून हिंगोली शहराकडे जातील.

कळमनुरी येथून जड वाहतूक बसेस यांना हिंगोली शहरात वाशिम सेनगाव कडे जाण्यासाठी खानापूर बायपास मार्गे बासंबा कॉर्नर (डेंटल कॉलेज) येथून हिंगोली शहरात किंवा वाशिम कडे जातील.

मौजे कारवाडी पिंपळखुटा येथून खानापूर बायपास बासंबा कॉर्नर (डेंटल कॉलेज) मार्गे हिंगोली शहरात येतील.

वरील प्रमाणे 2 ते 4 जानेवारी 2023 दरम्यान पहाटे 5 ते सकाळी 11.59 पर्यंत वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Related posts

प्रवासी निवाऱ्यासाठी विद्यार्थिनींचे अमर उपोषण! उपोषणाला कुरुंदा ग्रामस्थांचा पाठिंबा

Santosh Awchar

सतत गुन्हे करणारी टोळी पोलीस अधीक्षकांच्या हिटलिस्टवर ! पुसेगाव येथील दोघे दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार

Santosh Awchar

शेख नईम शेख लाल ‘सावित्रीज्योती सम्मान जीवन गौरव पुरस्कार 2022’ ने सम्मानित

Santosh Awchar

Leave a Comment