Marmik
Hingoli live

हिंगोली जिल्हा पोलीस भरती: पहिल्या दिवशी 207 उमेदवारांची दांडी

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – शासन निर्णयानुसार येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून 2 जानेवारीपासून जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेस सुरुवात झाली. पोलीस भरतीच्या पहिल्याच दिवशी 207 उमेदवार गैरहजर राहिले.

शासन निर्णयानुसार पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली.

भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी 647 उमेदवारांना बोलावण्यात आले होते त्यापैकी 440 उमेदवार हजर झाले. या उमेदवारांना पैकी 344 उमेदवार पात्र तर 96 उमेदवार अपात्र ठरले. पात्र 344 उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली.

यामध्ये 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे, गोळा फेक या प्रकारात 50 गुणांची चाचणी घेण्यात आली. पोलीस भरतीच्या पहिल्याच दिवशी बोलावण्यात आलेल्या 647 उमेदवारांपैकी 440 उमेदवार हजर राहिले तर 207 उमेदवारांनी या भरतीकडे पाठ फिरवली.

3 जानेवारी रोजी जिल्हा पोलीस भरतीसाठी 620 उमेदवारांना बोलावण्यात आले असून मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.

एक उमेदवार चक्कर येऊन पडला

हिंगोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून 2 जानेवारीपासून पोलीस भरती प्रक्रिया राबविली जात आहे. भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी मैदानी चाचणीसाठी आलेला एक उमेदवार चक्कर येऊन पडला. सदरील उमेदवारास तातडीने उपचारासाठी नेण्यात आले.

Related posts

25 फेब्रुवारी रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी येणार हिंगोलीत

Santosh Awchar

आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या 12 सोशल मीडिया वापरकर्त्यावर कारवाई

Santosh Awchar

महाराष्ट्र शासन सेवेत लागलेल्या नवनियुक्त उमेदवारांचा उद्या जाहीर सत्कार

Santosh Awchar

Leave a Comment