मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी देशातील १८ राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाची तालुका कार्यकरणी गठीत करण्यात आली आहे. यामध्ये तालुका अध्यक्ष पदी विठ्ठल देशमुख तर उपाध्यक्ष पदी जगन वाढेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
व्हाईस ऑफ मिडिया या संघटनेची तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना देश, प्रदेश पातळीवर काम करीत आहे. गुरुवारी (ता.०५) सेनगाव येथील व्ही.के. देशमुख मंगल कार्यालय येथे तालुका बैठक संपन्न झाली असून यामध्ये जिल्हाध्यक्ष रमेश कदम ,जिल्हा सरचिटणीस रमेश चेंडके जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी देशमुख गजानन वाणी माधव दिपके, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर उंडाळ कार्यवाहक शाम सोळंके ,संघटक मनीष खरात, गजानन पवार यांच्या उपस्थितीत सेनगाव तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे.
या कार्यकारणीमध्ये तालुका उपाध्यक्ष शेख फारूक, सचिव देविदास कुंदर्गे, कार्याध्यक्ष वसंत खिल्लारी, संघटक गजानन धुळधुळे, संघटक मंगेश धाबे, सह सरचिटणीस संतीष घनमोडे, कोषाध्यक्ष शिवाजी गिरी, कार्यवाहक संतोष दिवाने, प्रसिद्धी प्रमुख रमाकांत पोले, संघटक भारत शिंदे अशी नियुक्ती करण्यात आली.
व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना ५० ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारिता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी स्थापन केली आहे. देशातील आठरा राज्यांमध्ये संघटना कार्यरत असून राज्यातील सुमारे २२ जिल्ह्यात संघटनेचे कार्य सुरू आहे. कोरोना काळात १३६ पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र त्यांच्या कुटूंबियांना कुठलिही मदत मिळाली नाही. मात्र या संघटनेने पत्रकारांच्या १५० पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आहे. पत्रकारिता पत्रकार यांच्या हितासाठी संघटनेचे कार्य सुरू आहे.
गुरुवारी सेनगाव तालुका कार्यकारी बैठकीत व्हाईस ऑफ मीडियाचे सभासद जगन पाटील, शंकर भैराणे, प्रदीप वाघ, अविनाश धाबे, बालाआप्पा कोडे, दिलीप कावरखे, गजानन हमाने, परमानंद तांबिले, भागवत वाघ, मोहन कांबळे, सिकंदर पठाण ,गणेश सुतार वसंत खिल्लारी संदीप कावरखे, कयूम शेख,भास्कर कायंदे, समाधान कांबळे ,गजानन धूळधुळे आदींची उपस्थिती होती…