मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यातील कडोळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय पोषण आहारतील वाटाणा व हरभऱ्याच्या उसळ खाल्ल्यानंतर मळमळ होणे, उलट्या होणे पोट दुखने हि लक्षणे दिसून आल्याने 20 ते 22 विद्यार्थ्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव येथे नेण्यात आले व त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपच्यारादरम्यान खाल्लेल्या पोषण आहारातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले.
हे सर्व प्रकार घडल्यानंतर वाटाणे व हरभऱ्याच्या उसळीची तपासणी करण्यात आली त्यादरम्यान त्यात आळ्या आढळून आल्या. हे आळ्या शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळे या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असे समजले.
विद्यार्थ्यांवर गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार चालू आहेत. आता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक असून आरोग्य विभागाचे अधिकारी व शैक्षणिक विभागाचे अधिकारी यांनी संबंधीत शाळेला भेट दिली असून चौकशी सुरू आहे.
शालेय पोषण आहाराची तपासणी होईना
जिल्ह्यातील अनेक शाळा मध्ये देण्यात येणारा पोषण आहार हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून तो ज्या जाग्यावर शिजवला जातो ती जागाही बहुतांश ठिकाणी स्वच्छ नाही. अधिकाऱ्यांकडून मुलांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराची नियमित तपासणी होत नाही हे घडलेल्या प्रकारावरून समोर येते. या सर्व प्रकरणी दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.