मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने न्यायालयाकडून प्राप्त 46 अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करून यातील इसमांना पकडून न्यायालयात हजर करण्यात आले.
हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने गुन्हे प्रतिबंध व गुन्हेगारांवर वचक राहावी म्हणून विशेष कोंबिंग ऑपरेशन व प्रतिबंधक कार्यवाही तसेच अवैध धंद्याविरोधात विशेष कार्यवाहीची मोहीम राबविली जात आहे.
त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने व मार्गदर्शनात प्रत्येक आठवड्यात प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा व्हावा न्यायालयात साक्षीदार व आरोपी हे वेळेवर समन्स व वॉरंटनुसार हजर व्हावेत अशी अपेक्षा असते, परंतु न्यायालयाकडून वेळोवेळी समंस निघूनही तारखेवर हजर न राहणारे व ज्यांच्या बाबत न्यायालयाकडून प्राप्त अजामीन पात्र व जामीन पात्र वॉरंट, पोटगीवारंट बजावणी बाबत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
6 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली ग्रामीण विवेकानंद वाखारे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनात आज रोजी जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत अजामीनपात्र जामीनपात्र वॉरंट, पोटगी वॉरंट बाबत विशेष मोहीम घेण्यात आली. सदर मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी तसेच अंमलदार सहभागी झाले होते.
सदर मोहिमेत विशेष कामगिरी करताना पोलिसांनी न्यायालयाकडून अनेक वेळा समंस निघूनही तारखेवर न्यायालयात हजर न राहणाऱ्या व ज्यांच्या बाबत न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले होते असे एकूण 46 अटक वॉरंटची बजावणी केली आहे.
सदर अटक वॉरंट मधील इसमांना पकडून न्यायालया समक्ष हजर करण्यात आले सदर मोहिमेत न्यायालयाकडून प्राप्त 41 जामीन पात्र वॉरंटचीही बजावणी करण्यात आली