Marmik
Hingoli live

सेनगाव येथे कयाधू नदी जनसंवाद यात्रा कार्यक्रम, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले मार्गदर्शन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-

सेनगाव – तालुक्यातील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा, येथे महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभाग जिल्हा प्रशासन वन विभाग, हिंगोली आणि उगम ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “कयाधू नदी जनसंवाद यात्रा जानूया नदीला” हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष जयाजी पाईकराव, प्रमुख वक्ते भास्करराव पेरे पाटील (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच), प्रमुख पाहुणे विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक भास्करराव बेंगाळ, प्राचार्य अभिषेक बेंगाळ, उपाध्यक्षा आंनदीताई बेंगाळ,सचिव अंकुशराव बेंगाळ,नरवाडे पाटील, दिनेश जमदाडे, दामु अण्णा घुगे, राहुल साळवे, प्रकाशराव पाटील, कैलास खिल्लारे, उमेश देशमुख, वैशाली वाघ, मुख्याध्यापक शिंदे आर.बी., मुख्याध्यापक सरकटे व्ही.एस., मुख्याध्यापक बाजगिरे बी.जी. पर्यवेक्षक कसाब पी.पी. हे उपस्थित होते.

यावेळी संस्थेच्या वतीने भास्करराव पेरे पाटील यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक जयाजी पाईकराव यांनी आपण दररोज 7 प्रकारच्या प्लास्टिक पिषव्या घरी आणतो. त्या पिषव्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले.

तसेच संस्था अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांनी भास्करराव पेरे पाटील यांना गावाचा विकास कसा केला? सरपंच कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले.भास्करराव पेरे पाटील यांनी आपल्या गावाचा विकास कसा केला? सरपंच कसा असावा, याविषयी मार्गदर्शन केले.

भास्करराव पेरे पाटील यांनी आपल्या विचारा मधून नदीपासून 2 कि.मी.पर्यंत पाणी घाण असते. त्यामुळे आपण नदी स्वच्छ ठेवली पाहिजे, पाणी अस्वच्छ झाल्यामुळे आयुष्य कमी झालं, प्लास्टिक घातक असते. 1400 वर्ष सडत नाही. त्यामुळे वेगवेगळे आजार होतात, मेलेल्या माणसाची राख नदीमध्ये टाकायची नाही, संडासला नदीवर जायचे नाही या महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या.

माझ्या गावातील स्मशान भूमीमध्ये 125 जांभळाचे झाडे आहेत‌. गावांमध्ये 200 नारळाची झाडे आहेत. रिकाम्या जागी घराच्या समोर भाजीपाल्याच्या वेल लावल्या. त्यामुळे प्रत्येक लोकांनी आपल्या घरासमोर स्वच्छता ठेवून निसर्गाची जपणूक करा. गाव, शाळा, नदी परिसर स्वच्छ ठेवा. निसर्गानी आपल्याला मोफत दिले आहे. त्या मोफतच्या निसर्ग सानिध्याचा आनंद घ्या व आयुष्य वाढवा असे मार्गदर्शनही उपस्थित मान्यवरांनी केले.

यावेळी आभार काळे बी‌.के. यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व परिसरातील पालक उपस्थित होते.

Related posts

देऊळगाव जहागीर ग्रामपंचायतीने केलेल्या 13 लाख रुपयांच्या खर्चाची चौकशी करा; उपसरपंचाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Jagan

सर्व सेवांच्या प्रलंबित अर्जाचा निपटारा करुनसेवा पंधरवाड्याची यशस्वी अमंलबजावणी करावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश 

Santosh Awchar

परमेश्वर इंगोले यांना छत्रपती संभाजी महाराज युवा गौरव पुरस्कार जाहीर

Gajanan Jogdand

Leave a Comment