Marmik
Hingoli live

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन : जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयात विविध कार्यक्रम

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त हिंगोली पोलिसांकडून जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले.

महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 साली झाली भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला त्या दिवसापासून 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. सदर महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त आठवडाभर पोलीस विभागाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात 7 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये हिंगोली शहर पोलीस ठाणे यांनी आदर्श कॉलेज येथे जाऊन विद्यार्थी व शिक्षकांना पोलीस विभागाचे कामकाज वाहतुकीचे नियम बँड पथक यांची माहिती दिली.

कुरुंदा पोलीस ठाणे यांनी त्यांच्या हद्दीतील चोंडी आंबा येथील जिल्हा परिषद शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांना वाहतूक नियम व इतर कायदे, डायल 112 हेल्पलाइन नंबर त्यांच्या कामकाजाबाबत माहिती दिली.

आखाडा बाळापूर पोलीस ठाणे यांनी आखाडा बाळापूर व वारंगा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये पथनाट्य व इतर प्रबोधन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम व पोलीस ठाणे कामकाजाबाबत माहिती दिली.

वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात कडून विद्याभारती इंग्लिश स्कूलमध्ये कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना वाहतूक नियम व शस्त्रा बाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले.

या सर्व कार्यक्रमांना विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

Related posts

हिंगोली शहरातील मंगळवारा परिसरातील सराईत गुन्हेगार एका वर्षासाठी स्थानबद्ध

Gajanan Jogdand

Hingoli अतिवृष्टी ग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Santosh Awchar

पालकमंत्र्यांशिवाय होणार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे ध्वजारोहन

Gajanan Jogdand

Leave a Comment