मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शेतमालावरील वायदे बंदी उठवावी अन्यथा 23 जानेवारीपासून सेबीच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटना जिल्हा हिंगोली च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भारताचे पंतप्रधान यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी शेतकरी संघटने कडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलनही करण्यात आले.
20 डिसेंबर 2022 रोजी एक आदेश काढून सात शेतीमालावर वायदे बाजारात व्यापार करण्यास एक वर्षाची मुदत वाढ देण्यात आली. सदरचा निर्णय शेतकरी व्यापारी व संबंधित उद्योजकांना नुकसानकारक आहे.
स्वतंत्र भारत पार्टीने 23 जानेवारी पासून बांद्रा – कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सेबीच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन जाहीर केले आहे. आंदोलनातील सर्व मागण्या शेतकरी संघटनेला मान्य आहेत.
शेतकऱ्यांना मारक असलेला वायदे बंदी ला एक वर्ष मुद्दत वाढ देण्यात येणार असल्याचा निर्णय सेबीने तातडीने मागे घ्यावा व सर्व शेतमाल वायदे सुरू करावेत तसे न झाल्यास 23 जानेवारी रोजी सेबीच्या कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात हिंगोली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या व देशाच्या हितासाठी शेतमालावरील वायदे बंदी त्वरित मागे घ्यावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.
या निवेदनावर शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्ष अंजलीताई पातुरकर डॉक्टर पातुरकर देवी प्रसाद ढोबळे, उत्तमराव वाबळे, प्रल्हादराव राखुंडे, राजकुमार कुटे, खंडबाराव पोले, खंडबाराव नाईक, शेषराव राखुंडे, तुळशीराम पठाडे, आप्पाराव सोळंके, चंपतराव पोले, मुंजाराव बेंगाळ, आनंदराव वाबळे, रामकृष्ण देशपांडे, भाऊराव शिंदे, विठ्ठल भुमरे, रमेश गरड, ज्ञानेश्वर जाधव, रामदास गोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.