Marmik
Hingoli live News

आरोग्य क्षेत्रात हिंगोली जिल्हा राज्यात अव्वल! पाच आरोग्य संस्थांना राज्य शासनाचा कायाकल्प पुरस्कार

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली  – येथील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत राज्य शासनाच्या सहा आरोग्य संस्था कार्यरत आहेत. या सहा आरोग्य संस्थापैकी पाच आरोग्य संस्थांना राज्य शासनाचा कायाकल्प पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

या पुरस्काराची निवड करण्यासाठी राज्य स्तरावरील समिती प्रत्येक आरोग्य संस्थेची पाहणी करुन त्यातील सुविधा, आरोग्य सेवा, गुणवत्ता अशा एकंदरीत कामकाजाचे अवलोकन करुन हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील महिला रुग्णालय, वसमत यांना तीन लाखाचा पुरस्कार मिळाला आहे. तर उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, ग्रामीण रुग्णालय औंढा नागनाथ, ग्रामीण रुग्णालय सेनगाव, ग्रामीण रुग्णालय आखाडा बाळापूर यांना प्रत्येकी एक लाखाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

यामध्ये हिंगोली जिल्हा आरोग्य क्षेत्रात राज्यात अव्वल ठरला आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित बैठकीत वैद्यकीय अधीक्षक सर्वश्री.डॉ.गंगाधर काळे, डॉ. बी.टी.चिलकेवार, डॉ. सचिन राठोड, डॉ. गजानन हरण, डॉ. डी. बी. डोंगरे, डॉ. पी. व्ही. भोरगे यांचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कौतूक केले.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मंगेश टेहरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.लांजेवार, डॉ. गोपाळ कदम, डॉ.दीपक मोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ.चव्हाण, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, गणेश साळुंके इत्यादी हजर होते.  

Related posts

माजी मंत्री रजनी सातव यांचे निधन

Gajanan Jogdand

29 जुलैला होणार हिंगोली आइडल _6

Gajanan Jogdand

श्रींच्या पालखीचे भास्करराव बेंगाळ यांच्याकडून आदरातिथ्य

Gajanan Jogdand

Leave a Comment