मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – पोटगी वॉरंट मधील मागील दोन वर्षांपासून फरार असलेल्या इसमास पोलिसांनी मोठ्या सीताफिने पकडून ताब्यात घेतले.
नरसी नामदेव पोलीस ठाणे अंतर्गत एका पोटगी वॉरंट प्रकरणातील गैर अर्जदार इसम नामे समाधान घोशीर हा मागील दोन वर्षापासून पोलिसांना मिळून येत नव्हता. सदर वॉरंट बजावणी बाबत न्यायालयानेही वेळोवेळी कळविले होते. पोलिसांचे शोध पथक नमूद गैर अर्जदार याचा वेळोवेळी विविध ठिकाणी जाऊन शोध घेत होते.
नमूद गैर अर्जदार हा शेतात राहत होता व पोलीस आले की पळून जायचा. तसेच त्याच्या घरच्यांना शिकवून ठेवले होते की, पोलीस घरी आल्यावर काय उत्तर द्यायचे पोलिसांकडे सुद्धा त्याचा सध्याचा तो कसा दिसतो त्याचा फोटो नव्हता.
12 जानेवारी रोजी नरसी नामदेव पोलिसांना माहिती मिळाल्यावरून नमूद गैर अर्जदार समाधान घोषिर रिधोरा हद्दीत गाव परिसरात आहे अशी माहिती मिळाल्याबरोबर नरसी नामदेव पोलिसांचे पथक मोटार सायकलवर रात्री आठ वाजेच्या दरम्यान रिधोरा गावात पोहोचले.
नमूद गैर अर्जदार याचा स्पष्ट फोटो पोलिसांकडे नव्हता व सदर एकाच ठिकाणी 15 ते 20 लोक थांबून होते. त्यात पोलिसांना आरोपी ओळखायचा कसा असा प्रश्न पडला.
मात्र पोलिसांकडे आरोपीचा जुना मोबाईल नंबर होता त्यावर फोन केला असता उभा असलेल्या इसमान पैकी एका इसमाचा फोन वाजला तेव्हा नमूद गैर अर्जदार यांनी मोबाईल वरचा नंबर पाहिला तसे त्याच्या लक्षात आले की आजूबाजूला पोलीस आले आहेत. त्याने चपळाईने शेतात पडण्यास सुरुवात केली. आधीच सतर्क असलेले पोलीस अंमलदार महाजन व गीते यांनी त्याचा पाठलाग करून त्या शेतातील ताब्यात घेतले.
ही कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनात नरसी नामदेव पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे, पोलीस अंमलदार नंदकिशोर महाजन, संदीप गीते यांनी केली.
पोलीस अधीक्षक जय श्रीधर यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहीम सुरूच
हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक आठवड्यात प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा लवकरात लवकर निघणारा व्हावा, न्यायालयात साक्षीदार व आरोपी हे वेळेवर समन्स व वारणानुसार हजर व्हावेत ही अपेक्षा असते, परंतु न्यायालयाकडून वेळोवेळी समंस निघूनही तारखेवर हजर न राहणारे व ज्यांच्या बाबत न्यायालयाकडून प्राप्त अजमीन पात्र व जामीन पात्र वॉरंट, पोटगीवारंट बजावणी बाबत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात वॉरंट बजावणी पोलीस विभागाकडून होत आहे. या मोहिमेत महत्त्वाचे असे पोटगी प्रकरणातील वॉरंट बजावणीवरही विशेष लक्ष देऊन कार्यवाही केली जात आहे.