मकर संक्रांति निमित्त पारंपारिक पद्धतीने व हिंदू रितीरिवाजा नुसार वान लुटताना हिंगोली येथील माजी नगरसेविका श्रीमती यशोदाबाई कोरडे व मार्मिक महाराष्ट्र समूहाचे मुख्य संपादक गजानन जोगदंड यांच्या अर्धांगिनी सौ. विमल गजानन जोगदंड
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – मकर संक्रातीचा सण जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त महिलांनी वाण लुटले तर लहान मुलांसह युवक व पुरुषांनी पतंग उडविण्याचा आनंद घेतला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंगोली जिल्ह्यात मकर संक्रात हा इंग्रजी महिन्यातील पहिला हिंदू सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळपासून विविध गीतांच्या तालीवर लहान मुलांसह युवक व पुरुषांनी पतंग उडविण्याचा आनंद घेतला. अनेकांनी पतंग उडवून काहींचे पतंग काटल्याचा आनंद अनेकांना झाला.
मकर संक्रात निमित्त लहान मुलांसह महिला – पुरुषांनी नवे वस्त्र परिधान करून या सणाचा आनंद घेतला महिलांनी आपल्या विविध देवदेवतांना विशेष करून विठ्ठल रुक्मिणी वान देऊन आपापसात वाहन लुटण्याचा आनंद घेतला.
देवाला वाण अर्पण करण्यासाठी हिंगोली शहरातील देवडा नगर भागात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महिलांनी मोठी गर्दी केली होती.
या सणानिमित्त महिलांनी नव्या वस्त्रांसह डाग दागिने घालून वान लुटण्याचा आनंद द्विगुणीत करून घेतला तर लहान मुलांनी तसेच युवकांनी व पुरुषांनी हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषेतील गीतांच्या तालीवर पतंग उडविण्याचा आनंद घेतला.
यामध्ये विशेष करून अहिराणी भाषेतील ‘हाय झुमका वाली पोर’ ह्या गाण्याची क्रेझ होती. मकर संक्रात हा सण जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने व पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.