मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यातील 23 जानेवारी रोजी पासून महादेव महाराज यात्रा महोत्सवास प्रारंभ होणार आहे. या यात्रा महोत्सवात सोमवार रोजी शंकर पट, 25 जानेवारी रोजी क्रिकेटचे सामने, 28 जानेवारी रोजी कबड्डीचे सामने व 30 जानेवारी रोजी कुस्त्यांचे सामने होणार आहेत. या यात्रेदरम्यान आयोजित सामन्यांमधून 2 लाख 11 हजार 111 रुपयांची जंगी लूट होणार आहे.
यात्रा महोत्सवा निमित्त 23 जानेवारी रोजी श्री महादेव महाराजांचा भंडारा व सकाळी 11 ते दुपारी एक या दरम्यान ह.भ.प. भीमराव महाराज भिलजकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल नंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
महादेव महाराज यात्रेचे उद्घाटन हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, राष्ट्रवादी चे सेनगाव तालुका अध्यक्ष रवींद्र गडदे, सेनगाव पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांच्या हस्ते केले जाणार आहेत.
23 जानेवारी रोजी व 24 जानेवारी यादरम्यान शंकर पटाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन सचिन नाईक व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते केले जाणार आहे.
या शंकरपटात प्रतिम बक्षीस सेनगाव वन परिमंडळ अधिकारी चव्हाण यांच्याकडून 11 हजार रुपयांचे ठेवण्यात आले असून द्वितीय बक्षीस विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्याकडून 7 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे तर तृतीय बक्षीस आडोळ सरपंच परमेश्वर पोले यांच्याकडून 5 हजार रुपयांचे तृतीय बक्षीस दिले जाणार आहे. यासह इतर अनेक बक्षीसही या शंकरपटात ठेवण्यात आले आहे.
25 ते 27 जानेवारी रोजी क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले असून या सामन्यांमध्ये जि प माजि सदस्य गजानन खंदारे यांच्याकडून 11 हजार रुपयांचे प्रथम बक्षीस तर सिद्धोधन आळणे, डॉ. दन्नर, डॉ. घोडके यांच्याकडून सात हजार रुपयांचे द्वितीय बक्षीस ठेवण्यात आले आहे.
आडोळ यात्रा कमिटी कडून या सामन्यांमध्ये पाच हजार रुपयांचे तृतीय बक्षीस ठेवण्यात आले आहे. 28 ते 29 जानेवारी या दरम्यान कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले असून यामध्ये प्रथम बक्षीस विलासराव कोकरे व सुदर्शन वाठोरे यांच्याकडून पाच हजार रुपये ठेवण्यात आले आहेत.
द्वितीय पारितोषिक बद्रीनाथ यांच्याकडून तीन हजार रुपये दिले जाणार आहे तर तृतीय पारितोषिक पवार यांच्याकडून 2100 रुपये दिले जाणार आहेत.
30 जानेवारी रोजी कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाचे उद्घाटन राजेश (भैय्या) पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. या सामन्यांमध्येही भरघोस पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
यात्रा महोत्सवा दरम्यान 23 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता ढेगज वनोजा रेपा गणेश पूर आजेगाव या बारी मंडळींचा बारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या यात्रा महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीमहादेव महाराज यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र खिल्लारे, उपाध्यक्ष प्रल्हाद हनवते यांच्यासह परमेश्वर पोले, नारायण दन्नर,डॉक्टर खोडके, परमेश्वर पोले, सरपंच नारायण पाटील, माधव पोले, खिल्लारे, सतीश खिल्लारे, सुदर्शन वाठोरे, देविदास खिल्लारे, आजाबराव दन्नर योगेश पोले, विश्वनाथ व्यवहारे, संजबाबाराव पोले, डॉ. गोमाजी मार्कड, लक्ष्मण झाडे, मुकिंदा खिल्लारे, संभाजी खिल्लारे, गोपाल पोले, प्रभाकर पोले, पंजाबराव पोले, अशोक पोले, शेख खय्युम शेख मेहबूब, माधवराव फुले यांनी व समस्त गावकरी मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.