मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – 26 जानेवारी 2023 रोजी भारतीय प्रजासत्ताकाचा 73 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील मुख्य ध्वजारोहण सकाळी 9.15 मिनिटांनी राज्याचे कृषिमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या होणार आहे.
या मुख्य ध्वजारोहण जिल्ह्यातील उपस्थित राहणाऱ्या सुजाण नागरिकांनी आपल्या सोबत काही सामान, पिशवी, बॅग, पर्स, इलेक्ट्रॉनिक यंत्र इत्यादी सारखे साहित्य सोबत घेऊन येऊ नये तसेच आपल्याला काही संशयित वस्तू, इसम, बेवारस वाहन निदर्शनास आल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्ष हिंगोली येथील 08669900676 वर बॉम्बशोधक व नाशक पथक किंवा जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती कळवावी.
त्याचप्रमाणे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी केले आहे.