मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – येथील पोलिसांच्या सतर्क व दक्षपणामुळे पालकांपासून दुरावलेले दोन वर्षाचे बाळ अवघ्या काही तासात सेनगाव पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे जिल्हाभरात कौतुक केले जात आहे.
हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनात हिंगोली पोलीस सतर्क राहून सोखपणे कर्तव्य पार पाडत आहेत. याचा प्रत्यय आज रोजी शेनगाव शहरात आला.
पालकांपासून अचानक दूर झालेले बालक पोलिसांच्या प्रयत्नामुळे अवघ्या काही वेळातच पालकांना मिळू शकले आहे. 26 जानेवारी रोजी सेनगाव पोलीस ठाणे अंतर्गत सेनगाव शहरातील आकाश जांगिड व संतोष हरण यांना एक दोन वर्षाचा बालक मुलगा गावाच्या बाहेर बालाजी मंदिर शेजारी एकटाच रडत असलेला दिसला.
त्यांनी आजूबाजूला पाहणी करून सदर मुलाजवळ कोणीही नसल्याने ते आपल्या आई-वडिलांपासून दुरावला आहे. म्हणून सकाळी अंदाज 11 वाजेच्या दरम्यान सदर बालकास सेनगाव पोलीस ठाणे येथे घेऊन आले. सदर बालक हे दोन वर्षाचे असल्याने त्यास बोलताही येत नव्हते. त्याचे नाव व पालकांविषयी काही सांगता येत नव्हते.
तेव्हा सेनगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे व त्यांच्यासोबत पोलिस अंमलदार सुभाष चव्हाण, शेखर यादव व संतोष जाधव यांनी तात्काळ सेनगाव पोलीस ठाणे येथील मोटार सायकलवर नमूद बालकास घेऊन सेनगाव शहरात फिरून लोकांना विचारपूस करून या बालकाच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन तास झाले तरी त्याच्या पालकाचा शोध लागला नाही.
तेव्हा निराश न होता प्रभारी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे आणि त्यांच्यासोबत वरील अंमलदार यांनी पोलीस ठाण्याच्या चार चाकी वाहनात सदर बालकास घेऊन वाहनातील पीए साऊंड सिस्टीम वरून सदर बालका बाबत माहिती देत आवाहन करत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांच्या पीए सिस्टीम चा आवाज येऊन नमूद बालकाचे वडील पंजाब कुरवाडे धावत पोलीस वाहनाजवळ आले. मागील बराच वेळापासून सदर पालक हे व्याकुळ होऊन या बालकाचा शोध घेत होते.
बालकास पाहून वडिलांना अश्रू अनावर झाले. पोलिसांनी नमूद बालकास सुरक्षितरीत्या त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले दुरावलेला बालक परत जवळ आल्याने या बालकाच्या पाल्यांचा आनंद गगनात नवीन असा झाला होता.
सेनगाव शहरातील वर नमूद दक्ष नागरिक व सेनगाव पोलिसांमुळे अचानक दुरावलेला दोन वर्षाचा बालक सुखरूपपणे तात्काळ पालकांना मिळू शकला. नमूद बालकाचे पालक व परिसरातील नागरिकांनी भावनिक होत पोलिसांचे आभार मानले.