मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – महाराष्ट्र राज्य एस नियंत्रण सोसायटी मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा हिंगोली रुग्णालय यांच्यावतीने 26 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन व पंधरवाडा निमित्त जिल्हा रुग्णालय हिंगोली येथून भव्य प्रभात फेरी व शपथ ग्रहण कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 8.30 वाजता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मंगेश टेहरे यांच्या हस्ते हिरवी झेंडे दाखवून करण्यात आले.
यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक ज्ञानेश्वर चौधरी यांनी राष्ट्रीय युवा दिनाची उपस्थितांना शपथ दिली. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिनाचे ब्रीदवाक्य इट्स ऑल इन द माइंड (कोणत्याही व्यक्तीच्या समस्यांचे मूळ मुख्यतः त्याचे स्वतःचे विचार आहेत) आहे.
युवा वर्ग, गरोदर माता, अति जोखीम गट आणि सामान्य नागरिक हे एच आय व्ही प्रतिबंधासाठी बदल घडू शकतात त्यासाठी कलंक व भेदभाव कमी करण्यास आज आपण सर्वांनी मिळून सहभाग नोंदवण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रभात फेरीच्या उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी डॉ. दीपक मोरे, डॉ. गोपाल कदम, डॉ. विठ्ठल रोडगे, डॉ. नामदेव पवार, डॉ. सुनील पाटील, डॉ. पुंडगे डॉ. मनीष बगडिया, डॉ. भालेराव, डॉ. विठ्ठल करपे नोडल अधिकारी, डॉ. प्रकाश कोठुळे एस.एम. ओ. आर्ट, डॉ. अवुलवार, गणेश साळुंखे, प्राचार्य कविता भालेराव तसेच रुग्णालयाचे सर्व अधिकारी परिचारिका कर्मचारी यांच्यासह टी.आय. एनजीओ, Vihaan एनजीओ यांचे कर्मचारी उपस्थित होते.
सदरील प्रभात फेरीत शासकीय नर्सिंग महाविद्यालय जिल्हा रुग्णालय हिंगोली व इतर महाविद्यालयातील युवक युवतींनी सहभाग नोंदवला.
जिल्हा रुग्णालयापासून निघालेली प्रभात फेरी गणेश वाडी – रिसाला नाका – नेहरूनगर – गणेशवाडी शाळा – रिसाला बाजार – नर्सिंग महाविद्यालय – जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे पोहोचली. यावेळी उपस्थित सर्व युवक युवती यांना एचआयव्ही एड्स प्रतिबंधासाठी युवकाचा सहभाग याबाबत ज्ञानेश्वर चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी “कोणत्याही व्यक्तीच्या समस्याचे मूळ मुख्यता त्याचे स्वतःचे विचार आहेत”… “वचन पाळा एड्स टाळा” यासह इतर अनेक घोषणांनी सर्व वातावरण दुमदुमून गेले. याप्रसंगी उपस्थित सर्व युवक व युवती यांना पाणी चहा व बिस्कीट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय पवार, आशिष पाटील, टीना कुंदनाणी, साबळे, वाठोरे बलखंडे, अब्दुल मुजीब, सुनीता गायकवाड, नितीन राठोड व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.