मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अपहरत झालेल्या तीन पीडित मुलींचा यशस्वीरित्या शोध घेतला आहे. सदरील मुलींना संबंधित पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी जिल्ह्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा तसेच गुन्ह्यातील पीडित व पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध याबाबत तपास पथकांना विशेष सूचना देऊन कार्यवाही सुरू केले आहे.
जिल्ह्यातील ज्या पोलीस ठाण्यात बालकांसंबंधी दाखल कलम 363 अपहरणाचे जे गुन्हे प्रलंबित आहेत ज्या गुन्ह्यांना चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे अशा गुन्ह्यांकडे विशेष लक्ष देऊन त्यातील पीडित व आरोपी यांचा शोध घेऊन गुन्ह्याचा लवकर निपटारा व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
सदर कक्षात अशा गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करून त्यात पोलिस अधिकारी व अंमलदार यांची नेमणूक केली आहे.
अशा बालकांचे अपहरणासंबंधीचे दाखल गुन्हे ज्यांना चार महिन्याचा कालावधी झालेला आहे व त्यातील पीडित बालकांचा शोध मिळून आल्यास सदर गुन्ह्यांचा जलद तपासासाठी व पीडितांच्या शोधासाठी सदर गुन्हे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग केले जातात.
त्यात बालकांचा अपहरणाचे गुन्हे ज्यांचे तपासाचा कालावधी चार महिन्यापेक्षाही जास्त झालेला आहे अशा कलम 363 भादवी अन्वय तीन गुन्हे तपासासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडे वर्ग करण्यात आले होते. तेव्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील तपास पथकाने सदर गुन्ह्यांचा जलद गतीने तपास करून गुन्ह्यातील पिढीतांचा यशस्वी शोध घेतला आहे.
त्यात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दाखल गुरनं. 238 / 2019 कलम 363 भादवी गुन्हा फिर्यादीच्या तक्रारीवरून त्यांची अल्पवयीन मुलगी व 16 वर्ष हिला आरोपीने फूस लावून पळून नेले अशा तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे हिंगोली शहर व पुढे हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकाऱ्यांनी केला व त्यांनी नमूद गुन्ह्यातील पीडित मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. गुन्ह्याचा तपास 9 डिसेंबर 2022 रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला.
सदर कक्षातील तपास पथकाने गुन्ह्याचा जलद गतीने तपास व गोपनीय बातमीदार यांच्या माध्यमातून 22 जानेवारी रोजी अथक प्रयत्न करून गुन्ह्यातील पीडित मुलीचा यशस्वीरित्या शोध लावला व गुन्ह्याच्या पुढील सखोल तपासकामी नमूद पीडित मुलीस हिंगोली शहर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
तसेच हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुरनं. 377 / 2022 कलम 363 भादवी गुन्ह्यात फिर्यादीच्या तक्रारीवरून त्यांची नात मुलगी वय 16 वर्ष चार महिने हिचे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अपहरण केले अशा तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास हिंगोली शहर पोलीस ठाणे येथील तपासी अधिकारी यांनी केला व त्यांनी नमूद गुन्ह्यातील पिढीत मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु गुन्ह्यातील पीडित मुलगी व आरोपीचा शोध न लागल्याने नमूद गुन्ह्याचा तपास 21 जानेवारी रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पक्षाकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला.
सदर कक्षातील तपास पथकाने अतिशय जलद गतीने तपास करून व सायबर सेल हिंगोली यांच्या मदतीने अवघ्या 6 दिवसात 27 जानेवारी रोजी अथक प्रयत्न करून गुन्ह्यातील पीडित मुलीचा ओझर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथून यशस्वी शोध घेऊन पुण्यातील पीडित मुलगी व आरोपी यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या पुढील सखोल तपासकामी नमूद पीडित मुलीस व आरोपीस हिंगोली शहर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तसेच कुरुंदा पोलीस ठाणे येथे दाखल गुरनं. 64 / 2022 कलम 363 भादवी गुन्ह्यात फिर्यादीच्या तक्रारीवरून त्यांची अल्पवयीन मुलगी व 17 वर्ष हीच आरोपीने ऊस लावून पळून नेले आहे अशा तक्रारीवरून कुरुंदा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुण्याचा तपास कुरुंदा पोलीस ठाणे येथील तपासी अधिकारी यांनी केला व त्यांनी नमूद गुन्ह्यातील पीडित मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
नमूद गुन्ह्याचा तपास 8 नोव्हेंबर 2022 रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. सदर कक्षातील तपास पथकाने गुन्ह्याचा जलद गतीने तपास करून व सायबर सेल हिंगोली यांच्या मदतीने दोन महिन्यात नमूद मुलीचा यशस्वी शोध घेतला.
21 जानेवारी रोजी अथक प्रयत्न करून पुण्यातील पीडित मुलीचा पेठ शिवारात जिल्हा पुणे येथून यशस्वी शोध घेऊन पुण्यातील पीडित मुलगी व आरोपी यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या पुढील सखोल तपासकामी नमूद पीडित मुलीस व आरोपीस कुरुंदा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अशा प्रकारे लहान बालकांच्या अपहरणाचे गुन्हे जे चार महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून तपासावर प्रलंबित होते. त्यातील पिढीतांचा शोध मिळून येत नव्हता असे कलम 363 भादवी अपहरणाचे गुंठे पोलीस ठाणे हिंगोली शहर येथील दोन व कुरुंदा पोलीस ठाणे येथील एक असे एकूण तीन गुन्हे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पक्षाकडे तपासासाठी दिल्यानंतर सदर तपास पक्षातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचा तपास अतिशय जलद गतीने करून गोपनीय बातमीदार व सायबर सेल यांच्या मदतीने गुन्ह्यातील पीडितांचा शोध घेण्यात यशस्वी झाले.
ही कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, पोलीस उपनिरीक्षक मारुती नंदे, पोलीस अंमलदार गजानन बर्गे, साहेबराव राठोड, महिला पोलीस अंमलदार नंदा धोंगडे व गोकुळा बोलके सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष हिंगोली व सायबर सेलचे पोलिस अंमलदार प्रमोद थोरात यांनी केली.