मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – महाराष्ट्र पोलीस दलात प्रदीर्घ काळ निष्ठेने सेवा करणारे येथील वसमत उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे हे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांना व त्यांच्यासह सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निरोप देण्यात आला.
महाराष्ट्र पोलीस दलात प्रदीर्घकाळ खडतर्व निष्ठेने सेवा करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असलेले अधिकारी व अंमलदार यांचा 1 फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथील संत नामदेव बैठक हॉल येथे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निरोप समारंभ पार पडला.
सदरील कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, सेवानिवृत्त होत असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर आनंदरावकांबळे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह वैजनाथ मुंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू व इतर पोलीस अधिकारी, अंमलदार, कार्यालयीन स्टाफ व सेवानिवृत्त होत असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने हजर होते.
सदर कार्यक्रमात 31 जानेवारी 2023 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असलेले वसमत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर आनंदराव कांबळे, राखीव पोलीस निरीक्षक शामराव देवला राठोड नेमणूक पोलीस मुख्यालय, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास दामोदर आप्पा मिटकर ने. पोलीस ठाणे हिंगोली ग्रामीण, पोलीस हवलदार योगेंद्र गोकुळदास धमके ने. जिल्हा विशेष शाखा हिंगोली यांचा सपत्नीक व सहपरिवार अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमात सेवानिवृत्त होत असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी भावनिक होत महाराष्ट्र पोलीस दलातील प्रदीर्घ अशा सेवाकाळातील अनेक प्रसंगासह आपल्या भावना व्यक्त केल्या.
अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात सेवानिवृत्त होत असलेले अधिकारी व अंमलदार यांचे पुढील आयुष्य सुख समृद्धीने भरपूर व आरोग्य संपन्न जावो अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांनी केले.