हिंगोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार! आमदार संतोष बांगर यांच्या पाठपुराव्याने नऊ हजार घरकुले मंजूर
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी शिवसेना कळमनुरी विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार संतोष (दादा) बांगर यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून तब्बल 9000 वाढीव घरकुले मंजूर करून आणली आहेत त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाज बांधवांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातील 80 पेक्षा अधिक गावे आदिवासी बहूल म्हणून ओळखली जातात. याशिवाय इतर गावांमधूनही आदिवासी कुटुंब आहेत.
शासनाने शबरी आवास योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यासाठी यापूर्वी 603 घरकुले मंजूर केली होती, मात्र जिल्ह्यातील आदिवासी बांधवांची संख्यात लक्षात घेता सदरील घरकुले अत्यंत कमी प्रमाणात होती त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मोठा कालावधी लागणार होता.
हिंगोली जिल्ह्यात शबरी आवास योजनेअंतर्गत वाढीव घरकुले मंजूर करावी अशी मागणी आदिवासी समाज बांधवांकडून आमदार संतोष (दादा) बांगर यांच्याकडे केली जात होती. समाज बांधवांचा हा प्रश्न लक्षात घेऊन आमदार बांगर यांनी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला होता.
त्यानंतर शासनाने हिंगोली जिल्ह्यासाठी 9000 घरकुले मंजूर केली आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील 9000 आदिवासी कुटुंबांना हक्काचे घरकुल मिळणार आहे. शासनाकडे पाठपुरावा करून वाडी घरकुले मिळवून घेतल्याबद्दल आदिवासी समाज बांधवांनी आमदार संतोष (दादा) बांगर यांचे आभार व्यक्त केले आहे