मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील सराईतपणे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या आणखी दोघांना हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. याआधीही पुसेगाव येथील दोघा जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. तर मागील दोन दिवसात सेनगाव तालुक्यातून चार जणांना दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे.
हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालविणाऱ्या विरुद्ध तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाहीची भूमिका घेत असे गुन्हे सराईत करणाऱ्या विरुद्ध प्रभावी प्रतिबंध कार्यवाही केली जात आहे.
डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आज रोजी हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव पोलीस ठाणे हद्दीतील पुसेगाव येथील राहणारे सराईत गुन्हेगार आकाश श्यामसुंदर धाबे (वय 23 वर्ष), श्यामसुंदर कुंडलिक धाबे (वय 49 वर्ष दोन्ही रा. पुसेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली) यांच्याविरुद्ध नरसी नामदेव पोलीस ठाण्यात शरीराविरुद्ध एकूण तीन गुन्हे दाखल असून ते संघटितपणे सतत गुन्हे करतच आहेत.
त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांच्या अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालीमुळे परिसरातील ग्रामस्थांच्या जीवितास धोका उत्पन्न होत आहे. त्यामुळे नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांनी नमूद आरोपी विरुद्ध कलम 55 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये हद्दपारचा प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग हिंगोली किशोर कांबळे यांनी सविस्तर करून नमूद आरोपींच्या टोळीस हिंगोली जिल्ह्यातील हद्दपार करण्याबाबत पोलीस अधीक्षक यांच्या कडे शिफारस केली.
यावरून हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अन्वये नमूद दोन्ही आरोपींना आज पासून पुढील दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्याबाबत आदेश काढले आहेत.
हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर हे समाजात शांतता नांदावी म्हणून सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्याबाबत कोंबिंग व ऑल आऊट ऑपरेशन मधून नियमित तपासणी तसेच त्यांच्या बाबत कठोर प्रतिबंधक कार्यवाही करत आहेत.