मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यातील कळमनुरी, हिंगोली व हट्टा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या बाराशिव यात्रेत सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 10 व्यक्तींवर दामिनी पथकाने प्रतिबंधक कार्यवाही केली आहे.
हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस व जनता सुसंवाद वाढविण्यावर व विशेष करून शाळा, महाविद्यालय तसेच शिकवणी व वस्तीगृह या ठिकाणी त्याचप्रमाणे शहरातील बसस्थानक, रेल्वे स्थानक, मुख्य बाजारपेठ व धार्मिक स्थळे तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी मुली व महिला तसेच बालकांबाबत होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सदर परिसरात मुली महिला व बालक यांना सुरक्षितता वाटावी म्हणून दामिनी पथकास विशेष सूचना देऊन कार्यरत केले आहे.
सदर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, पोलीस शिपाई प्रकाश कांबळे, महिला पोलीस अंमलदार आरती साळवे, अर्चना नखाते, शेख सलमा यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सदर दामिनी पथकाने मागील आठवड्यात 6 ते 12 फेब्रुवारी या दरम्यान हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनात हिंगोली शहरात तसेच कळमनुरी शहरात व हट्टा पोलीस ठाणे हद्दीतील बाराशिव यात्रेत दोन दिवस महत्त्वाच्या एकूण 52 ठिकाणी भेटी दिल्या.
सदरील परिसरात सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या वटवाळखोर अशा 10 इसमावर कलम 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही केली आहे.
दामिनी पथकाने अडचणीच्या वेळी तात्काळ मदतीसाठी हेल्पलाइन नं. 8007000493 ची सेवा सुद्धा सुरू करून त्याचा प्रसार केला आहे.