मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – हिंगोलीत सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त रयतेचे राजे कुळवाडी भूषण यांची आज १९ फेब्रुवारी रोजी मावळ्यासह घोडदळ व ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांमध्ये सर्व शिवभक्तांनी व नागरिकांनी या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे यांनी केले आहे. जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंगोली शहर भगव्या ध्वजांनी सजले आहे.
हिंगोलीत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन मागील मागील १२ फेब्रुवारीपासून दररोज सुरू आहेत. यामध्ये बॅडमिंटन स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराजा वरील ऐतिहासिक छायाचित्रावर विद्यार्थ्यांना माहिती सादरीकरण, बुद्धिबळ स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, खोखो स्पर्धा, हॉलीबॉल स्पर्धा, कुस्ती दंगल अशा आदी स्पर्धा व मैदानी खेळ हिंगोली जिल्ह्यासह विदर्भ मराठवाड्यातील खेळाडू येऊन उत्कृष्टरित्या प्रदर्शन दाखवत हिंगोली चे नाव सांस्कृतिक कार्यक्रमात सर्व दूर नेले आहे.
१८ फेब्रुवारी रोजी अॅथलेटीक्स निवड चाचणी, वकृत्व स्पर्धा, अभिनय, वेशभूषा व गायन, रांगोळी, दिपोत्सव, शिवगितांचा बहारदार कार्यक्रम यासह दिपोत्सव, शिवगीताचा कार्यक्रम संगीत सूर्य केशवराव भोसले संस्कृतीक परिषद आयोजित संपन्न झाला.
१९ फेबु्रवारी रोजी सकाळी ६ वाजता शिवअभिषेक, ध्वजारोहन सात वाजता ,८ वाजता शिवपाळणा व शिवगजर हे कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा परिसर हिंगोली येथे होणार आहे. त्यानंतर ९ वाजता भव्य मोटारसायकल रॅली १० वाजता रक्तदान शिबीर,१०.३० वाजता शिवशंभो ढोल पथकाचा शुभारंभ व रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा ते जवाहर रोड, गांधी चौक, इंदिरा चौक या मार्गे शोभा यात्रा ढोल ताशाच्या गजरात काढण्यात येणार आहे.
या मिरवणूकीमध्ये शिवज्योत मावळयासह घोडदळ, वारकरी मंडळी, मुख्यरथ, वारकरी महिला, शिवशंभो ढोल पथक, लेझिम पथक, चलचित्र पथक देखावा, बँड पथक, विविध शाळांचे देखावे यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच ४ वाजता शिवछत्रपती गौरव पुरस्कार व बक्षिस वितरण केले जाणार आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा परिसरात भव्य आतिषबाजी व दिपोत्सव होणार आहे. त्यानंतर ७ वाजता गजानन जाधव व संच नांदेड यांचा शिवपोवाडे असा भव्यदिव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी दिवसभर अन्नदान व जागोजागी पाण्याची व्यवस्था सर्व सर्वधर्म बांधवाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींनी, माता-भगिनी, युवक, युवती यांनी सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे यांनी दिली. यावेळी मार्गदर्शक पप्पू चव्हाण, अॅड.अमोल जाधव, कल्याण देशमुख, भूषण देशमुख, सचिव अॅड.विलास नवघरे, कार्याध्यक्ष शिवशंकर घुगे, कोषाध्यक्ष पवन जाधव, प्रसिद्धी प्रमुख शिवाजी मेटकर, उपाध्यक्ष सचिन पाटील, अॅड.उल्हास पाटील, अॅड. मनोज आखरे, मनीष आखरे, कल्याण देशमुख, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यासह लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकार्यांची उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान या श्री शिवछत्रपती महोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आकर्षक सजावट करण्यात आली असून हिंगोली शहर हे कमानीने व स्वागताच्या पोस्टर ने सजले आहे. या ऐतिहासिक शिवजन्मोत्सवामध्ये सर्व धर्म बांधवांनी सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे यांनी केले आहे.(विशेष प्रतिनिधी)
शिव महोत्सव कार्यक्रमाची रुपरेषा
शिवअभिषेक सकाळी ६ वाजता, ध्वजारोहण सकाळी ७ वाजता, शिवपाळणा व शिवपुजन, शिवगजर सकाळी ८ वाजता, मोटारसायकल रॅली सकाळी ९ वाजता, शिवशंभो ढोल ताशांचा शुभारंभ व भव्य मिरवणुक शोभा यात्रा सकाळी १०.३० वाजता, भव्य अतिषबाजी व दिपोत्सव सायंकाळी ६ वाजता, शिवपोवाडे सायंकाळी ७ वाजता.
श्री शिवछत्रपती गौरव पुरस्कार चे आज वितरण
हिंगोलीत मागील चार वर्षापासून श्री शिवछत्रपती गौरव पुरस्कार आपल्या जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या नि:पक्षपाती व प्रामाणिकपणे समाजामध्ये काम करणार्या व्यक्तींची पुरस्कर्त्यांची निवड श्री शिवछत्रपती गौरव समितीने केली आहे. त्यामध्ये सामाजिक क्षेत्र पुरस्कार खंडेराव सरनाईक हिंगोली, साहित्य क्षेत्र पुरस्कार प्रा.डॉ.रामभाऊ मुटकुळे वसमत, शैक्षणिक क्षेत्र पुरस्कार एकनाथराव कर्हाळे डिग्रस, क्रीडाक्षेत्र पुरस्कार किरण नामदेव साळुंखे दांडेगाव, कृषी व पशूपालन क्षेत्र पुरस्कार बाळासाहेब राऊत वसमत यांना जाहीर करण्यात आला असून आज १९ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सायंकाळी ४ वाजता प्रदान करण्यात येणार असल्याचे समन्वय समितीचे पदाधिकारी व सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे यांनी केले आहे.