Marmik
Hingoli live

आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत कळमनुरी येथे रामचंद्र सात महाराज यांचा पालखी सोहळा भक्तीभावात साजरा

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत बंजारा समाजाची दुसरी काशी असलेल्या कळमनुरी येथील रामचंद्र सात महाराज यांचा पालखी महोत्सव मोठ्या भक्ती भावात संपन्न झाला.

यावेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष तथा हिंगोली जिल्ह्यातील लाडके आमदार आमदार संतोष (दादा) बांगर यांनी संत रामचंद्र सात महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

पारंपारिक वाद्य वाजवून संत नामाचा गजर करीत पालखी उत्सवास मोठ्या भक्तीभावात सुरुवात केली.

यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष राजेश्वरराव पतंगे, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, तांडा वस्ती सुधार समिती अध्यक्ष ऍड. संतोष भाऊ राठोड, प.स.सदस्य संजय मंदाडे, सुरेंद्र ढाले, शिवसेना शहरप्रमुख बबलू पत्की, डॉ. राहुल नाईक उपस्थित होते.

तसेच रमेश राठोड, गणेश राठोड, राजू नागरे, सुरेश पवार, शंकर बांगर, शिवराज पाटील, सतीश खर्जुले, विकास सदावर्ते, पिंटू गडदे शिवम नाईक, सुरेश पवार व मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव उपस्थित होते.

Related posts

नियमित सकस आहार घेतल्यास कुपोषण दूर होते- डॉ.नामदेव कोरडे

Gajanan Jogdand

विराट लोकमंच ने मुख्यमंत्र्यांसह शासन- प्रशासनातील सर्वांनाच केला बांगड्यांचा आहेर; निषेधही नोंदविला

Gajanan Jogdand

सेनगावमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट, पोलिसांचे.. तोंडावर बोट!

Gajanan Jogdand

Leave a Comment