मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यात शांतता नांदावी तसेच जातीय सलोखा टिकून राहावा म्हणून हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून सर्व धर्माची शिकवण एकच हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव व बासंबा पोलीस ठाणे यांच्याकडून विविध कार्यक्रम घेण्यात आले.
जिल्ह्यात शांतता नांदली पाहिजे सर्व जाती धर्मातील नागरिकांनी एकमेकांबद्दल आदर व सन्मान बाळगून जातीय व सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यात आणि प्रशासनास मदत करावी या व्यापक हेतूने हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात जातीय सलोखा व सामाजिक सद्भावना हा उपक्रम जिल्हा पोलीस दलाकडून राबविला जात आहे.
सदर उपक्रमांतर्गत सर्व धर्माची एकच शिकवण हा कार्यक्रम जिल्हा पोलीस दलाकडून संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
सदर उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम यामध्ये व्याख्यान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर तसेच शाळा महाविद्यालय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रम घेतले जात आहे.
सर्व धर्माची एकच शिकवण अंतर्गत बासंबा पोलीस ठाणे यांनी 23 फेब्रुवारी रोजी सिरसम दूरक्षेत्र येथे सर्व धर्मातील नागरिकांना एकत्र बोलावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला तर कार्यक्रमास पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नानाराव कोल्हे, पोलीस अंमलदार व सिरसनचे सरपंच शामराव फलटणकर, आदिनाथ मस्के, उमाजी ढाकरे, भगवान पठाडे, शेख शकील, शेख दाऊद, श्रीधर कवडे व परिसरातील इतर प्रतिष्ठित ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने हजर होते.
वृक्षारोपण कार्यक्रमानंतर पोलीस निरीक्षक श्रीमनवार यांनी सर्व धर्माची शिकवण एकच उपक्रम घेण्यामागची भूमिका व महत्त्व विशद करून मार्गदर्शन केले.
24 फेब्रुवारी रोजी नरसी नामदेव पोलीस ठाणे यांनी जिल्हा परिषद शाळा नरसी नामदेव येथे सदर उपक्रमांतर्गत व्याख्यानाचा कार्यक्रम घेतला.
सदर कार्यक्रमास नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे, पोलीस अंमलदार व ह.भ.प. राजाभाऊ नागरे, महंमद वहिदा महंमद शरीफ व धर्मगुरू शिराजुद्दीन काजी, तंटामुक्ती अध्यक्ष भिकाजी कदम, मुख्याध्यापक अशोक भिसे पत्रकार बापू इंगोले व ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांनी प्रास्ताविक करून त्यात सर्व धर्माची शिकवण एकच उपक्रम घेण्यामागची भूमिका व महत्त्व विशद केले.
कार्यक्रमात उपस्थित प्रमुख व्यक्ती व शिक्षक यांनी राष्ट्रीय एकता संवर्धन समभाव सामाजिक सद्भावना याबाबत अमूल्य असे मार्गदर्शन केले.