मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शहरातील गांधी चौक परिसरात असलेल्या हिंद प्रेसला दुपारी अचानक आग लागली. यामुळे परिसरात नागरिकांनी एकच गोंधळ केला होता.
हिंगोली शहरातील वर्दळीचा चौक म्हणून महात्मा गांधी चौक ओळखला जातो या भागात मोठ्या प्रमाणात व्यवसायिक दुकाने असून भाजी मंडई ही ह्याच भागात येते. गांधी चौक परिसरात हिंद प्रेस असून या प्रेसला 26 फेब्रुवारी रोजी दुपारी अचानक आग लागली.
हिंद प्रेसच्या दुकानातून लागलेल्या आजीने मोठ्या प्रमाणात धूर व अगीचे लोट बाहेर पडत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी येथे एकच गोंधळ घातला होता.
आग लागल्याचे समजताच हिंगोली नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकडून गाडी पाठविण्यात आली अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आगीत किती नुकसान झाले व ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.
आगीत सुदैवाने जीवित हानी झाली नसल्याचे समजते.