मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / सतीश खिल्लारी :-
सेनगाव – तालुक्यातील आडोळ ते रेपा रोडचे बांधकाम सुरू असून सदरील बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. सदरील बांधकाम चांगल्या दर्जाचे करावे अशी मागणी आडोळ ग्रामपंचायतचे सरपंच परमेश्वर पोले यांनी केले आहे.
सेनगाव तालुक्यातील आडोळ ते रेपा रोडचे बांधकाम प्रदीर्घ काळानंतर केले जात आहे. सदरील रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारक व प्रवाशांना अत्यंत गैरसोयीचा सामना करावा लागत होता. खराब रस्त्यामुळे या रोड वरून साधी दुचाकी चालवणे ही अवघड जात होते. सदरील गावांनी मागणी केल्यानंतर हा रोड तयार करण्यास मान्यता मिळाली.
सध्या या रोडचे बांधकाम सुरू असून ते संबंधित गुत्तेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. रोड झाल्यानंतर पहिल्याच पावसात हा रोड वाहून जाण्याची व जावो जागी खड्डे पडण्याची शक्यता असून शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात जाण्याची शक्यता आहे.
तसेच रस्ता खराब झाल्यास वाहनधारक व प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच गैरसोयीचा सामना करावा लागेल. त्यामुळे आत्ताच संबंधित विभागाने व अधिकाऱ्यांनी या रोड कडे लक्ष देऊन सदरील रस्त्याची गुणवत्ता तपासावी व हा रोड चांगल्या दर्जाचा करावा, अशी मागणी आडोळ ग्रामपंचायतचे सरपंच परमेश्वर पोले यांनी केले आहे.
तसेच हा रोड चांगल्या दर्जाचा व्हावा अशी अपेक्षा वाहनधारक प्रवाशांतून व ग्रामस्थांतून केली जात आहे.
दुर्लक्षिलेल्या या भागातील रोड चांगल्या दर्जाचा करावा – सरपंच परमेश्वर पोले
सेनगाव तालुक्यातील आडोळ ते रेपा हा भाग अत्यंत दुर्लक्षिलेला भाग असून भागातील जनतेचा कोणीही कैवार घेत नाही. लोकप्रतिनिधीही या भागातील जनतेकडे दुर्लक्ष करतात. मागणीनंतर कित्येक वर्षांनी या भागातील हा रोड मंजूर होऊन त्याचे बांधकाम केले जात आहे, मात्र संबंधित गुत्तेदाराकडून या रोडचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जातात शंभर पैकी दहा टक्केच रोड चे बांधकाम केले जात असून 90% रोडचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन रोडची गुणवत्ता तपासावी व सदरील रोड चांगल्या दर्जाचा करावा, अशी मागणी आडोळ ग्रामपंचायतचे सरपंच परमेश्वर पोले यांनी केले आहे.