Marmik
Hingoli live

पुरवठा विभागातूनच काळाबाजार करणाऱ्या माफियास जाणून बुजून सहकार्य! भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप, विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल 14 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर करणार उपोषण

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – येथील पुरवठा विभागातून काळाबाजार करणाऱ्या राशन धान्य माफिया कार्यवाही न करता जाणून बुजून सहकार्य करून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप विराट राष्ट्रीय लोक मंच कौन्सिलच्या वतीने करण्यात आला आहे. या सर्व प्रकाराविरुद्ध 14 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले जाणार असून कारवाई न झाल्यास 15 मार्च रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

कोवीड – 19 च्या प्रादुर्भावामुळे देशात हलाखीची परिस्थिती निर्माण होऊन बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे तसेच लोकांना रोजगार मिळत नसल्यामुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या वतीने अत्यंल्प दरात तसेच मोफत राशन पुरवठ्याची योजना सुरु करण्यात आलेली आहे. याचाच भाग म्हणुन शासनाव्दारे अत्यल्प दरात व मोफत मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

अंत्योदय कार्डधारक प्रत्येक कुटुंबास 2 रुपये किलो प्रमाणे 15 किलो गहु व 3 रुपये किलो प्रमाणे 20 किलो तांदुळ, शेतकरी व ईतर लाभार्थ्याना प्रति सदस्य 2 रुपये प्रति किलोप्रमाणे 2 किलो गहू व रुपये 3 प्रति किलोप्रमाणे 3 किलो तांदुळ, अंत्योदय लाभार्थ्यास प्रति सदस्य मोफत 2 किलो गहु व 3 किलो तांदुळ, अन्न सुरक्षा योजनेतंर्गत प्रति सदस्य मोफत 1 किलो गहु व 4 किलो तांदुळ, अश्या पध्दतीने प्रत्येक लाभार्थ्यास राशन देणे आवश्यक असतांना हिंगोली जिल्ह्यातील रास्त दुकानदारातर्फे लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने ठरवुन दिलेल्या दराप्रमाणे तसेच मोफत मालाचा पुरवठा केला जात नाही.

तसेच शासन नियमाप्रमाणे प्रत्येक स्वस्त रास्त दुकानदाराने आपली दुकाने सकाळी 8 ते 12 व दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु ठेवुन माल पुरवठा करणे अनिवार्य आहे.

त्याचप्रमाणे प्रत्येक लाभार्थ्यास दिलेल्या मालाची पावती पुरवठा केलेल्या मालासोबत देऊन त्यांची पोच घेणे आवश्यक आहे. परंतु संपुर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये याची कोणतीही अंमलबजावणी केली जात नाही. जिल्ह्यातील पुरवठा विभागामार्फत याची कोणतीही शहानिशा केली जात नसुन प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रास्त दुकानदार व काळाबाजारी करणारे माफीयांना जाणुनबुजुन सहकार्य करुन भ्रष्ट्राचार केला जात आहे.

शासन निर्णय दि.11.4.2019 प्रमाणे प्रत्येक रास्त दुकानदारास दर्शनी भागात फलक लावुन लक्ष्य निर्धारीत लाभार्थ्याना वितरीत करण्यात येणारे अन्नधान्याचे प्रमाण, किरकोळ विक्रीचे मुल्य, अन्नधान्याची पात्रता, रास्त भाव दुकाने उघडणे व बंद करण्याची वेळ, भोजनाची वेळ, अन्नधान्याचा दर्जा आणि प्रमाण, काही तक्रार असल्यास त्या कोणत्या अधिकाऱ्याकडे कराव्यात याबाबतची माहिती, तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक, हेल्पलाईन क्रमांक इत्यादीबाबत तपशिल फलकावर लावणे आवश्यक असतांना जिल्ह्यातील एकही रास्त दुकानदाराने याची कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही.

या सर्व बाबीची अंमलबजावणी तात्काळ करुन जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोडाऊनवर सिसिटीव्ही कॅमेरे लाऊन जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या दालनात त्यांचे लाईव्ह छायाचित्रीकरण प्रसारीत करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

रास्त दुकानदारामार्फत आपल्या मनमर्जीप्रमाणे दुकान उघडणे व बंद करणे, मनमर्जीप्रमाणे लाभार्थ्यांना अनियमीतपणे कमी मालाचा पुरवठा करुन संपुर्ण माल प्राप्त झाल्याबाबत त्यांचे अंगठे घेतले जात आहेत. माफोयाशी हातमिळवणी करुन शिल्लक राहिलेले अन्नधान्याचा काळाबाजारीकरण केला जात आहे.

त्याचप्रमाणे संपुर्ण हिंगोली जिल्ह्यातील सर्ब शासकोय गोडाऊनमधुन गोदामपाल, तहसिल कार्यालयाचा पुरवठा विभाग, जिल्हा पुरबठा विभाग तसेच त्यांच्या अधिनस्त काही अधिकारी व  कर्मचारी माफीयांशी हातमिळवणी करुन सर्रासपणे अन्नधान्याचा काळाबाजारीकरण करुन शासनाचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान करुन मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार करत प्रत्यक्ष लाभार्थ्यांना लाभापासुन वंचित ठेवण्याचे काम केले जात आहे.

हिंगोली जिल्ह्यातील काळाबाजारी करण करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाव्दारे अनेकवेळा धाडी टाकुन कारवाया केल्या जात असुन याबाबत वर्तमानपत्रामध्ये मोठमोठ्या बातम्या प्रसिध्दी होऊनही जिल्हा प्रशासन, जिल्हा पुरवठा विभाग व जिल्ह्यातील तहसिल अंतर्गत पुरवठा विभाग रास्त दुकानदार, काळाबाजारीकरण करणारे माफीया यांना अभय देण्याचा प्रयत्न करीत आहे.

संदर्भ 1 व 2 च्या निवेदनाव्दारे मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन व आंदोलने करुन या सर्व प्रकरणाची चौकशी करुन दोषी रास्त दुकानदार, गोडाऊनपाल, पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी, काळाबाजारी करणारे माफीयावर कठोर कारवाई करुन लाभार्थ्यांना नियमाप्रमाणे लाभ देण्यात यावे याकरिता विनंती करण्यात आली होती.

परंतु आजपर्यंत जिल्हा प्रशासन व जिल्हा पुरवठा विभाग तसेच जिल्ह्यातील पुरवठा विभागाव्दारे यासंदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही म्हणून याच्या निषेधार्थ विराट राष्ट्रीय लोकमंच काऊसींलव्दारे दि.14.3.2023 रोजीपासुन जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरु करुन दि.15 मार्च 2023 रोजीपासुन विविध पध्दतीने आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन, जिल्हा पुरवठा विभाग यांची राहिल याची नोंद घेऊन कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर निवेदनावर संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल सह, राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद, जिल्हा कार्याध्यक्ष शेख बासीत महेबुब, प्रदेश महासचिव अंड सय्यद मुस्तफा, जिल्हा उपाध्यक्ष रवी ब. जयस्वाल, तालुकाध्यक्ष शेख आवेज, जिल्हा प्रमुख महासचिव शेख शाहनवाज हुसैन, शहराध्यक्ष पठाण साजीद खान, जिल्हा महासचिव सतिश लोणकर, विद्यार्थी सं. जिल्हाध्यक्ष शेख अफरोज फिरोज, तालुका उपाध्यक्ष सय्यद गौस नुर, शहर सचिव पठाण रऊफखा, युवक शहराध्यक्ष मो.आमेर अली, शहर उपाध्यक्ष पठाण कलीम खान, का.का.सदस्य मो.जावेद चाऊस,मुखीद बागबाण, शकिल  बागबाण यांनी स्वाक्षरी केलेली आहे.

Related posts

सराईत गुन्हेगार कारागृहातच स्थानबद्ध! एमपीडीए कायद्याअंतर्गत केली सलग पाचवी कार्यवाही

Santosh Awchar

प्रवासी निवाऱ्यासाठी विद्यार्थिनींचे अमर उपोषण! उपोषणाला कुरुंदा ग्रामस्थांचा पाठिंबा

Santosh Awchar

जवळा शिवारात गांजाची लागवड; हट्टा पोलिसांची कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment