Marmik
Hingoli live

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 8 मार्च रोजीजागेवरच निवड संधी मोहिमेचे आयोजन  

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्यामार्फत दि. 8 मार्च, 2023  रोजी हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळावा यासाठी जागेवरच निवड संधी ही मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी  जागेवरच निवड संधी ही मोहिम चालू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील खाजगी संस्था, बँक, कंपन्यामध्ये असलेल्या रिक्त पदासाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना कामाची संधी दिली जाते. जास्तीत जास्त उद्योजकांनी आपली रिक्त पदे या कार्यालयास कळवितात.

त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा, हिंगोली येथे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जागेवरच निवड संधी माहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी दि. 8 मार्च, 2023 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत मनसा मोटर्स हिंगोली व जस्टडॉयल पुणे या कंपनीचे उद्योजक उपस्थित राहणार आहेत.

जस्टडॉयल कंपनीची 37 पदे रिक्त असून यामध्ये नांदेड-06, परभणी-06, हिंगोली-02, वाशिम-04, यवतमाळ-06, लातूर-04, उदगीर-04, उस्मानाबाद-05 पदाचा समावेश आहे.

तसेच महिंद्रा मनसा व मनसा मोटर्स हिंगोली यांची 19 पदे जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदवी या शैक्षणिक आर्हतेनुसार 55 पेक्षा अधिक रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन नोंदणी करुन स्वत: मूळ कागदपत्रासह जिल्हा विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा, हिंगोली येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे.

याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 7385924589 या भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

Related posts

हळद 18 हजारावर! तूरही दहाच्या पुढे

Gajanan Jogdand

पानकनेरगाव येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी शेतकऱ्यांचा दोन तास रास्ता रोको; सेनगाव- रिसोड महामार्गावर वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

Gajanan Jogdand

अतिवृष्टीतून वगळण्यात आलेल्या मंडळातील गावांना सरसकट आर्थिक मदत द्या, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन

Gajanan Jogdand

Leave a Comment