Marmik
Hingoli live

जलदिन : सर्व ग्रामपंचायतींनी जनजागृती करावी; मुख्य कार्यकारी अधिकारी एन. आर. केंद्रे यांचे आवाहन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

हिंगोली – जिल्ह्यात उद्या 22 मार्च रोजी जागतिक जलदिन साजरा केला जाणार आहे. जल दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी याबाबत जनजागृती करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. आर. केंद्रे यांनी केले आहे.

यावेळी जलदिनाचे औचित्य साधून अभियान सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी हर घर जलवाहनदारीमुक्त गाव घोषित करणे, सप्ताह दरम्यान स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदींबाबत ग्रामपंचायत मधील कामे या कार्यावर भर देणे.

जलजीवन मिशन अंतर्गत सर्व गावातील सर्व कुटुंबास तसेच प्रत्येक घर शाळा व अंगणवाडी सार्वजनिक संस्था इत्यादींमध्ये नळ जोडणी अभियान राबविणे, जलजीवन मिशन अंतर्गत जलदिनानिमित्त ग्रामपंचायत यांनी शपथ घ्यावी, ग्रामसभा बैठक घेऊन मान्यवरांद्वारे पाण्याचे महत्व समजावून सांगावे.

तसेच गावातील पाणी साठवण जैविक रासायनिक तिकीट एफ टी के किट द्वारे पाण्याची तपासणी करणे, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची देखील तपासणी करावी शून्य गळती साठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच तोट्या बसविण्यात याव्यात, लोकवर्गणी मोहीम, विद्यार्थ्यां मार्फत जनजागृती रॅली काढून हर घर जलगाव घोषित करणे आदी बाबी या अभियानादरम्यान करण्यात येणार आहेत.

सदरील अभियान ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वाटेगावकर तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एल. बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये राबविण्यात येणार आहे.

Related posts

नगरपरिषदेची नूतन इमारत अस्वच्छ; मुख्याधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर !

Santosh Awchar

आरोग्य केंद्र उठले ग्रामस्थांच्या जीवावर! रुग्णांना दिली जाताहेत एक्सपायरी औषधी!! जिल्हा आरोग्य यंत्रणेचे नियंत्रण नाही

Gajanan Jogdand

जिल्ह्यातील साठवण तलाव ओव्हरफ्लो

Santosh Awchar

Leave a Comment