Marmik
Hingoli live क्राईम

हिंगोली शहरातील मंगळवारा परिसरातील सराईत गुन्हेगार एका वर्षासाठी स्थानबद्ध

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – शहरातील मंगळवार परिसरात राहुन सराईत व सतत गुन्हे करणाऱ्या आरोपीस हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एका वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.

मागील अनेक वर्षांपासून नामे विशाल सुरेश सांगळे (वय 23 वर्षे रा. पोळा मारुती जवळ, हिंगोली) हा मागील अनेक वर्षांपासून हिंगोली शहर पोलीस ठाणे व बासुंबा पोलीस ठाणे हद्दीत शरीराविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सतत करत आहे.

त्याच्या विरोधात वरील पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, विनयभंग, दंगा करणे, मारामारी करून गंभीर दुखापत करणे, अशा गंभीर स्वरूपाचे 12 दखलपात्र गुन्हे तसेच तीन अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. तो अशा प्रकारचे सतत गंभीर गुन्हे करत असल्याने समाजासाठी धोकादायक बनवला होता.

तो अशा कृतीपासून परावृत्त व्हावा म्हणून त्याच्याविरुद्ध यापूर्वी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 107 व 110 अन्वये तीन वेळा प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. तसेच कलम 56 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय एका वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपारिचे आदेशही निघाले होते.

तरीही नमूद इसम हा गुन्हेगारी कृत्यापासून दूर न होता गंभीर स्वरूपाचे सतत गुन्हे करतच आहे. त्याच्या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांत भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. तो गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे करत असल्याने समाज स्वास्थ्यास व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहोचविणारा धोकादायक इसम ठरला होता.

म्हणून पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्फतीने नमूद इस्मविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कालवकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडिओ पायरेटर्स, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती ह्यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम 1981 एमपीडीए) अंतर्गत कार्यवाही बाबत हिंगोली चे दर्शन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.

पोलीस अधीक्षक यांनी सदरचा प्रस्ताव हिंगोली जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सदर प्रस्तावाची संपूर्ण सविस्तर पडताळणी करून नमूदिसमनामे विशाल सुरेश सांगळे (वय 23 वर्षे रा. पोळा मारुती जवळ, हिंगोली) हा एक सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरवून धोकादायक व्यक्ती बनल्याने त्यास एमपीडीए कायदा (1981 सुधारणा 1996 2009 आणि 2015) कलम 3 (1) अन्वय एका वर्षासाठी स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले आहेत.

Related posts

लम्पी स्किन : गुरे व म्हशींची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ने – आन करण्यास मनाई, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

Santosh Awchar

आगामी सण – उत्सव : नागरिकांनी बाहेरगावी जाताना काळजी घेण्याचे पोलिसांकडून आवाहन

Santosh Awchar

छत्रपती संभाजी महाराजांसह महापुरुषांची नावे बियर शॉपी व इतर व्यवसायांना लावण्यास प्रतिबंध करा; शिवधर्म फाउंडेशनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Gajanan Jogdand

Leave a Comment