Marmik
Hingoli live क्राईम

हट्टा पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरी चा गुन्हा उघड करण्यात हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास हट्टा पोलीस करत आहे.

27 नोव्हेंबर 2022 रोजी हट्टा पोलीस ठाणे हद्दीतील सातेफळ पाटीजवळ फिर्यादी अशोक तुळशीराम लांडगे (रा. बळेगाव तालुका वसमत) हे मोटार सायकलवर जात असताना दोन अनोळखी इसमानी जबरदस्तीने त्यांच्या मोटार सायकलला धक्का देऊन त्यांना खाली पाडून जबरदस्तीने त्यांच्या जवळील नगदी 17 हजार रुपये व मोटरसायकल घेऊन पळून गेले होते. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात भादविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्यातील आरोपींना पकडण्याबाबत हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना सूचना केली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने घटनास्थळी व परिसरात भेट देऊन असे गुन्हे करणाऱ्या आरोपींबाबत माहिती घेत अधिक तपास केला असता नमूद गुन्हा वसमत येथील राहणारे जोगिंदर रणजीतसिंग चव्हाण व जसविंदरसिंग रघुवीरसिंग चव्हाण यांनी मिळून केल्याची माहिती मिळाली.

25 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय शिताफीने जोगिंदर रणजीतसिंग चव्हाण यास वसमत येथून ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने नमूदचा गुन्हा जसविंदरसिंग रघुवीरसिंग चव्हाण याच्या सोबत मिळून केल्याचे कबूल केले.

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील फिर्यादीचे जबरीने चोरून नेलेले तीन हजार पाचशे रुपये नगदी जप्त केले असून आरोपीस हट्टा पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास हट्टा पोलीस करत आहेत.

ही कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंडित कचवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, राजूसिंग ठाकूर, विठ्ठल काळे, सुमित टाले, आकाश टापरे यांनी केली.

Related posts

जिल्ह्यातील सर्व शाळा 31 डिसेंबर पर्यंत तंबाखू मुक्त कराव्यात, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश 

Santosh Awchar

आषाढी एकादशी : नरसी नामदेव, औंढा नागनाथ व हिंगोलीतील देवडा नगर येथे दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी! गोकर्ण माळावर सपत्नीक चढाई करत रांगेत उभे राहून आमदार संतोष बांगर यांनी घेतले दर्शन

Santosh Awchar

जिजामाता नगर मधील गुन्हेगार एका वर्षासाठी स्थानबद्ध; डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची एमपीडीए अंतर्गत नववी कार्यवाही

Santosh Awchar

Leave a Comment