Marmik
Hingoli live क्राईम

हट्टा पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार एका वर्षासाठी स्थानबद्ध! एमपीडीए कायद्या अंतर्ग अंतर्गत 12 वी कार्यवाही

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – हट्टा पोलीस ठाणे हद्दीत शरीराविरुद्धचे सतत गुन्हे करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एका वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. एमपीडीए कायदा अंतर्गत केलेली ही जिल्ह्यातील बारावी कार्यवाही आहे.

हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व सतत गुन्हे करणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाहीची भूमिका घेऊन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची इत्यंभूत माहिती काढून ते करत असलेल्या गुन्ह्यांना प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता, एमपीडीए कायदा अंतर्गत प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही केली जात आहे.

मागील अनेक वर्षांपासून विश्वनाथ उर्फ सोनू दिलीपराव कदम (वय 19 वर्ष रा. तपोवन ता. औंढा नागनाथ जि. हिंगोली) हा मागील अनेक वर्षांपासून हट्टा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे करत आहेत.

त्याच्या विरुद्ध शरीराविरुद्धचे एकूण पाच गंभीर गुन्हे दाखल असून तो सतत गुन्हे करत आहेत. तो समाजासाठी धोकादायक बनला होता.

म्हणून पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने सदर प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.ए. बोराटे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय वसमत कदम यांच्या मार्फतीने नमूद इसमाविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टी वाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कालवकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडिओ पायरेट्रस) वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम 1981 (एमपीडीए) अंतर्गत कार्यवाही बाबत प्रस्ताव डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे सादर केला होता.

पोलीस अधीक्षक यांनी सदर प्रस्ताव हिंगोली जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सदर प्रस्तावाची संपूर्ण सविस्तर पडताळणी करून नमूद इसम विश्वनाथ उर्फ सोनू दिलीपराव कदम (वय 19 वर्ष रा. तपोवन ता. औंढा नागनाथ जि. हिंगोली) हा एक सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरवून धोकादायक व्यक्ती बनल्याने त्यास एमपीडीए कायदा 1981 (सुधारणा 1996, 2009 आणि 2015) कलम 3(1) अन्वय एका वर्षासाठी स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले आहेत.

Related posts

संभाजीनगर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहिता : जिल्हा कृषि महोत्सव व राज्यस्तरीय हळद महोत्सवाचा कार्यक्रम पुढे ढकलला

Santosh Awchar

पाच टवाळखोरांवर दामिनी पथकाची कार्यवाही

Santosh Awchar

Hingoli अर्भकाच्या मृत्यू प्रकरणी दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment