मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – शहरातील खुशाल नगर भागात राहणारा युवक अशोक गजानन आठवले याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली, मात्र त्याने आत्महत्या केलेली नसून त्याचा खून झाल्याचा संशय आल्याने त्याचे आई-वडील व नातेवाईकांनी या युवकाचा मृतदेह घेतला नसून आरोपींवर भादवि नुसार 302 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी हिंगोली शहर पोलीस ठाणे येथे सकाळपासून ठिया दिलेला आहे. त्यांची चौकशी अथवा विचारपूस अद्यापही एकाही अधिकाऱ्याकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे या नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
मयत अशोक गजानन आठवले ( रा. नवलगव्हाण ता. जि. हिंगोली, हं. मु. खुशाल नगर हिंगोली) या तरुणाने 30 मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
परंतु त्याने आत्महत्या केलेली नसून त्याचा खून झाल्याचा संशय त्याचे आई-वडील व नातेवाईकांना आला मयत अशोक आठवले याचा मृतदेह परस्पर त्याच्यासोबत राहणारे तृतीय पंथ व्यक्तींनी हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात आणला. त्यामुळे त्याचा खून झाल्याचा संशय अधिकच बळावला येथे हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक कांबळे यांनी पंचनामा केल्यानंतर त्याचे सेवाविच्छेदन करण्यात आले.
मात्र, नातेवाईकांनी त्याचा मृतदेह घेण्यास नकार दिला आणि घटनेतील संशयितांची चौकशी करावी व त्यांच्यावर 302 कलमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा यासाठी दुपारपासून हिंगोली येथील शहर पोलीस ठाण्यासमोर एक प्रकारे ठियाच दिला आहे.
मात्र, त्यांची चौकशी अथवा विचारपूस करण्यास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अथवा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी कोणतीच दखल घेतली नाही. रात्री सव्वा नऊ झाले तरी पोलीस निरीक्षक हे आले नव्हते. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.