मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शहरालगत असलेल्या निंबाळा मक्ता येथील महाराष्ट्र औद्योगिक वसाहत मध्ये असलेल्या कीर्ती गोल्ड या सोयाबीन कच्च्या तेलाच्या कंपनीमध्ये किंग कोब्रा जातीचे जोडपे आढळून आले. या जोडप्यास हिंगोली येथील सर्पमित्र उमेश पाटील व त्यांच्या मित्रांनी पकडून शहरापासून दूर 25 किलोमीटर अंतरावरील जंगलात नेऊन सुरक्षित स्थळी सोडून दिले.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून उकाडा जाणवू लागला आहे. उन्हाचे चटके बसू लागल्याने जीवाची काहीही होऊ लागली आहे. मानवाप्रमाणेच सरपटणाऱ्या प्राण्यांनाही गर्मी सहन होत नाही.
यामध्ये सापाचे रक्त हे थंड असते साप हा थंड जागेवर राहणारा प्राणी आहे. त्यांना थंड जागेवर राहण्यास आवडते. त्यामुळे दिवसभराच्या तप्त होऊन व उकाड्याने हैरान होऊन साफ रात्रीच्या सुमारास बाहेर पडतात.
हिंगोली शहरापासून जवळच असलेल्या लिंबाळा मुक्ता येथील महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीतील कीर्ती गोल्ड या कच्च्या तेलाच्या कंपनीमध्ये रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी किंग कोब्रा जातीचे जोडपे (लागवन) आढळून आली. या सापांना पाहून कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या काळजात धस झाले.
जवळपास सात ते आठ फुटाचे लांबीचे हे जोडपे होते. त्यांना अशा अवस्थेत पाहून कामगारात भीती निर्माण झाली. मात्र, या कामगारांनी या जोडप्यास कोणतीही इजा न करता हिंगोली येथील सर्पमित्र उमेश पाटील यांना फोन लावला.
काही मिनिटात सर्पमित्र उमेश पाटील व त्यांच्यासोबत शुभम, रणवीर, विश्वा जावळे व त्यांचे सहकारी मित्र मोनू लोणकर, करण सुतारे यांनी येथे तात्काळ भेट देऊन मोठ्या सीताफिने हे नाग नागिन पकडले.
किंग कोब्रा जातीच्या या जोडप्यास पकडून हिंगोली शहर व मानवी वस्ती पासून दूर 25 किलोमीटर अंतरावरील जंगलात सुरक्षित स्थळी सोडून देण्यात आले.
सध्या उन्हाळा सुरू असल्याने साप निघू लागले असून साप निघताच त्यांना न मारता त्यांच्यावर लक्ष ठेवून उमेश पाटील सर्पमित्र (9370698808), विश्व प्रताप जावळे सर्पमित्र(7822014954), शुभम रणवीर सर्पमित्र(8830407847) यांच्याशी संपर्क साधावा अथवा आपल्या जवळील सर्पमित्रांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.