Marmik
Hingoli live

5 एप्रिल रोजी सुशिक्षित बेरोजगारांसाठी जागेवरच निवड संधी मोहिमेचे आयोजन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्यामार्फत दि. 5 एप्रिल, 2023  रोजी हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळावा यासाठी जागेवरच निवड संधी ही मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी  जागेवरच निवड संधी ही मोहिम चालू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील खाजगी संस्था, बँक, कंपन्यामध्ये असलेल्या रिक्त पदासाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना कामाची संधी दिली जाते.

जास्तीत जास्त उद्योजकांनी आपली रिक्त पदे या कार्यालयास कळवितात. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा, हिंगोली येथे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जागेवरच निवड संधी माहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या महिन्याच्या पहिल्या बुधवारी दि. 5 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत बन्सल कोचिंग क्लासेस, हिंगोली या आस्थापनाचे उद्योजक उपस्थित राहणार आहेत. या आस्थापनेवरील टेलीकॉलर ची 4  महिलांची पदे, अकाऊंटंट- 2, रिेशेप्श्ननिस्ट-1 महिला, बॅच कॉर्डिनेटर-1, ॲकॅडमिक हेड-1, ऑफिस बॉय/सफाईगार-4 पदे भरण्यात येणार आहेत.

टेलीकॉलर पदासाठी शैक्षणिक पात्रता बी.एस्सी पदवी/डी.एड, अकाऊटंट पदासाठी बी.कॉम, टॅली, डीटीपी 1 वर्ष अनुभव, रिसेप्शनिस्ट पदासाठी पदवी, बॅच कॉर्डिनेटर पदासाठी बीएस्सी, ॲकेडमिक हेड साठी एम.एसस्सी बी.एड 1 वर्ष अनुभव, ॲकेडमिक हेड या पदासाठी एम.एससी बी.एड 1 वर्ष अनुभव, ऑफिस बॉय/सफाईगार पदासाठी  दहावी/बारावी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

जिल्ह्यातील दहावी, बारावी, पदवी व पदवीधर या शैक्षणिक आर्हतेनुसार 13 रिक्तपदे 

https://rojgar.mahaswayam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन नोंदणी करुन स्वत: मूळ कागदपत्रासह जिल्हा विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा, हिंगोली येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे.

याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 7385924589 या भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

Related posts

नरसी येथे दर्शनासाठी जाणारा ऑटो उलटला; चालकाचा ताबा सुटल्याने घडला अपघात

Santosh Awchar

सार्वजनिक गणेश मंडळांनी ऑनलाइन परवानगी घेऊनच श्रींची स्थापना करावी; हिंगोली पोलिसांचे आवाहन

Santosh Awchar

सीईओ संजय दैने यांची दाटेगाव येथे भेट; विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

Gajanan Jogdand

Leave a Comment