मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – पर्यावरण, प्रदूषण, शिक्षण अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिंगोली च्या वतीने राजकीय, शिक्षण, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्र, पर्यावरण, प्रशासन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा 11 एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह येथे हिंगोली भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक हे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोषदादा बांगर हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात आयपीएस अधिकारी वैभव बांगर, एबीएम इंग्लिश स्कूल अध्यक्ष दिलीप बांगर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, उपपरिवहन अधिकारी अनंता जोशी, व्यावसायिक संतोष बोरकर, हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी कु. मीनाक्षी पवार, शासकीय गुत्तेदार मयूर कयाल, प्रसिद्ध छाती रोग तज्ञ डॉ. अमोल धुमाळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी एड्स प्रतिबंधक विभाग ज्ञानेश्वर चौधरी, नवउद्योजक सचिन आठवले, आयुर्वेद तज्ञ डॉ. गजानन धाडवे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, यश डेव्हलपर्सचे प्रसन्न कुमार बडेरा, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख रेखाताई देवकते, उपजिल्हाप्रमुख सुशीलाताई आठवले, नृत्य शिक्षक सागर चौधरी, सेवा सदन मुलांचे वस्तीगृह च्या मिराताई कदम, वरुड चक्रपान ग्रामविकास अधिकारी अरुण वाबळे, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अरविंद मुंडे, शासकीय गुत्तेदार नइन खान, राजकीय विश्लेषक विशाल मुळे, विद्यार्थिनी नायशा अयाज अन्सारी, सुभाषसिंह वर्मा यांना हिंगोली भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संकल्प बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष सचिव संतोष नामदेव अवचार यांनी केले आहे.